सध्याच्या जीवनशैलीत महिलांना वाढत्या वयात प्रजननासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २० वर्ष वयोगटातील महिलांची प्रजनन क्षमता सगळ्यात जास्त असते. या कालावधीत गर्भधारणा सहज होऊ शकते. २० व्या वर्षाच्या सुरूवातीला आणि त्यानंतरही प्रजनन क्षमतेतील फरक जवळपास ० टक्के असतो. सध्याच्या काळात लोक ठराविक वेळेनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतात. कॉन्सेप्शन सायकलमध्ये पुरूष आणि महिला या दोघांची महत्वाची भूमिका असते. त्यावरच मुलांचे आरोग्य आणि गर्भावस्था अवलंबून असते.
या वयोगटातील महिलांमध्ये कोणतीही अनुवांशिक असामान्यता आढळून येत नाही. त्यामुळे लहान मुलांमध्ये डाऊन सिड्रोंम किंवा अन्य जन्म दोष होण्याची संभावना कमी असते. या वयोगटात गर्भपात होण्याचा धोकाही कमी वअसतो. याशिवाय वेळेआधी मुल जन्माला येणं, बाळाचं वजन कमी असणं, अशा समस्या येण्याचे चान्सेस कमी असतात. या वयोगटात गेस्टेशनल डायबिटिस आणि ब्लड प्रेशरसाऱख्या समस्यांचा धोकाही कमी असतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या वयात पुरूष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. महिलांमध्ये एग्सची संख्या ही मर्यादित असते. यावरून पुरूषांच्या तुलनेत महिलांची प्रजनन क्षमता वेगानं कमी होते असं दिसून येतं. याच वयोगटात प्री एक्लेमप्सिया नावाच्या आजाराचा धोका जास्त असतो. यामुळे महिलांना पीसीओडी किंवा गर्भाशयातील समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
३० नंतर - ३० नंतर गर्भधारणेदरम्यान सी सेक्शनची भीती जास्त असते. याशिवाय लहान मुलांमध्ये अनुवांशिक आजार होण्याची भीती असते, गर्भपात होण्याची संभावना वाढते, एक्टोपिक गर्भधारणा (एक्टोपिक गर्भधारणेमध्ये फर्टिलाईज्ड अंडी गर्भाशयाला जोडत नाही, उलट ते फॅलोपियन ट्यूब, उदरपोकळी किंवा गर्भाशयशी जोडतात.)
४० नंतर - सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना ४० वयानंतर गर्भधारणेसंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. 40 नंतर गर्भवती होणे अशक्य गोष्ट नाही. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की 40 ते 44 वयोगटातील प्रत्येक ओव्हुलेटरी चक्रानंतर गर्भधारणेचे प्रमाण 5% कमी होते. वयाच्या 45 वर्षानंतर हा दर 1% होतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, जगातील निम्म्या स्त्रिया आपल्या वयाच्या चौथ्या दशकात प्रजनन समस्यांनी ग्रस्त आहेत. या वयात पुरूषांची प्रजनन क्षमताही हळू हळू कमी होते. कारण शुक्रांणूंच्या संख्येत कमतरता जाणवते.
तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा बाळ होण्यासाठी प्लॅनिंग करू शकता. करिअरमुळे तुम्ही थोडं उशिरा बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर त्याचं व्यवस्थित नियोजन करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, व्यवस्थित आहार घ्या. जेणेकरून जेव्हा आपण कुटुंब वाढविण्यास तयार असाल तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागू नये.