प्रत्येक विवाहित जोडपं कुटुंब वाढवण्यासाठी प्लॅनिंग करतात. अर्थात हे वाटतं तेव्हढं सोपं नाही. अनेकांना मूल होण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते तर काहींना डॉक्टरांकडून ट्रिटमेंट घेतल्यानंतर मूल होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असाल तर फर्टाइल डेजपासून हेल्दी वेटपर्यंत काही सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. याशिवाय फर्टिलिटी वाढवण्यासाठी आहार व्यवस्थित घ्यायला हवा.
या अभ्यासात आहार आणि फर्टिलिटी यातील संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनमध्ये छापून आलेल्या लेखानुसार अनसॅच्यूरेटेड फॅट्स, भाज्या, मासे महिला आणि पुरूषांमध्ये फर्टिलिटी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅफेन आणि सॅच्यूरेडेट फॅट्स महिला आणि पुरूषांमध्ये फर्टिलिटी खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात. मुंबईतील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या क्लिनिकिलच्या डॉक्टर ऋचा जगताप यांनी हिंदूस्तान टाईम्सशी बोलताना काही उपाय सांगितले ज्यातून महिलांसह पुरूषांमधये फर्टिलिटी वाढवता येऊ शकते.
ताजी फळं आणि भाज्या
बीट, शिमला मिरची या भाज्या फर्टिलिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. आंबट फळं, हिरव्या पालेभाज्या यात फॉलिक एसिड असते. फर्टिलिटी वाढवण्यासोबतच मुलाचा चांगला विकास करण्यापासून, ताण तणाव दूर करण्यापर्यंत ताज्या फळांचा आहार शरीराला चांगले ठेवतो.
प्रोटिन्सचे सेवन
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आहारात प्रोटिन्सचा समावेश वाढवायला हवा. मोड आलेले मूग सोयाबीन, पनीर, डाळी, बीन्ससह एग व्हाईट, मासाहार केल्यानं शरीरातील प्रोटिन्सची कमतरता पूर्ण होते.
ड्राय फ्रुट्स
बेबी प्लॅनिंग करत असलेल्या जोडप्यांनी ड्राय फ्रुट्स खायला हवेत. यात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीरातील रिएक्टिव ऑक्सिजन स्पीशिज केमिकल कमी होते. हे केमिकल एग्स आणि स्पर्म खराब करतात. एंटी ऑक्सिडेंट्समुळे रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज केमिकलचे प्रमाण कमी होते.
थोडं थोडं खायचं
इन्फर्टिलिटीची समस्या असलेल्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. ५ टक्के वजन कमी करणंही ओव्हूलेशन सायकल व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार फर्टिलिटी वाढवण्यासाठी ३ वेळा जास्त खाण्यापेक्षा ५ ते ६ वेळा थोडं थोडं खायला हवं.
व्यायाम
जोडप्यांनी दिवसभरातून ३० ते ४५ मिनिटं वेळ काढून व्यायाम करायला हवा. जास्तीत जास्त पाणी प्या. तुमच्या शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं या सप्लिमेंट्स घेऊ शकता.
शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवावी
जर तुम्ही बाळासाठी तयारी करत असाल शरीरातील साखरेच्या पातळीवर विशेष लक्ष द्यायला हवं. साखरेची पातळी वाढल्यानं डायबिटीसनंसह स्पर्मची गुणवत्ता कमी होते. जर तुमच्या शरीरात साखरेची पातळी जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेऊन, चालण्याचा व्यायाम करून, डाएट करून साखरेची पातळी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा.
या पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका
आहारातून काही पदार्थ वगळणंही फर्टिलिटी वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतं. रेड मीट, तूप, जास्त कॉलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणं टाळावं याशिवाय मद्यपान, धुम्रपान करू नये.