'आई - बाबा' होणे हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. काही जोडप्यांना अनेक वर्षे आपण आईबाबा होणार या बातमीची वाट पाहावी लागते. शारीरिक दोष काहीही नसताना अनेकदा गर्भधारणा होत नाही. त्याने ताण वाढतो. मूल हवं असून ते होत नाही ही भावना अनेकींना तर फार छळते. इनफर्टिलिटीही नसते मात्र तरी पाळणा हलत नाही. त्यामुळे आता डॉक्टर सांगतातच की मूल हवं आहे हे ठरलं की आपली जीवनशैली बदला. चांगली हेल्दी लाइफस्टाइल ठेवा. त्यासाठी रोजच्या जगण्यात लहानसे बदल उपयुक्त ठरतात(Making These Simple Lifestyle Changes May Help Boost Fertility).
जीवनशैली कशी बदलणार?
१. आहार उत्तम हवा. प्रजनन क्षमता व गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी स्त्री - पुरुष दोघांनी फॉलेलेट व झिंकयुक्त, अँटिऑक्सिडंट-समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. अशा प्रकारचा आहार घेतल्याने प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. २. शुक्राणूंची गुणवत्ता आणि गर्भधारणेची शक्यता सुधारण्यासाठी फळे, भाज्या, धान्ये आणि काजू यांसारखे पदार्थ फायदेशीर ठरतात.
३. फायबरयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे अतिरिक्त संप्रेरक शरीरातून काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे ओव्हुलेटरी वंध्यत्व टाळण्यास मदत होते. ४. प्रजनन क्षमता व गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी काही फळे जसे की, अॅव्होकॅडो, रताळी त्याचप्रमाणे ओट्स आणि वेगवेगळ्या प्रकारची पौष्टिक धान्ये यांचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा.
५. बीन्स आणि मसूर हे फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले अन्नपदार्थ आहेत यांचे सेवन केल्याने स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनची शक्यता वाढवतात. ६. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट, झिंक आणि ओमेगा - ३ असते जे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवते. ७. रासबेरी, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी हे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतात. बेरी वर्गातील या फळांचे सेवन केल्याने पुरुष व स्त्री या दोघांची प्रजनन क्षमता सुधारते.
८. अक्रोडमध्ये ओमेगा - ३ आणि ओमेगा - ६ फॅटी ऍसिड्स असतात ज्यामुळे पुरुषांचे वीर्य आरोग्य सुधारण्यास मदत होते, परिणामी शुक्राणूंची गतिशीलता, प्रमाण आणि आरोग्य चांगले होते. ९. रोजचा ठराविक वेळ व्यायाम, वजन नियंत्रणात, योगासनं, मानसिक स्वास्थ्य हे सारंच अत्यंत गरजेचं आहे. ते रोज सातत्यानं करत जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवं.
१०. कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. प्रजनन क्षमता किंवा गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करावे. एका अभ्यासात असे सूचित केले आहे की, ज्या स्त्रिया दररोज ५०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करतात, त्यांना गर्भवती होण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणून, दररोज एक किंवा दोन कप कॉफी पिणे योग्य आहे, परंतु त्यापेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करु नये.