Lokmat Sakhi >Health >Infertility > Women's Health : महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या वाढवतात ही ७ लक्षणं; तरूण मुलींनी वेळीच सावध व्हा

Women's Health : महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या वाढवतात ही ७ लक्षणं; तरूण मुलींनी वेळीच सावध व्हा

Women's Health : काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदना होतात तर काहींना अजिबात होत नाहीत. तर काहींची पाळी लवकरत संपत नाही.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:24 PM2021-08-18T15:24:36+5:302021-08-18T15:36:01+5:30

Women's Health : काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदना होतात तर काहींना अजिबात होत नाहीत. तर काहींची पाळी लवकरत संपत नाही.  

Women's Health : These signs may indicate infertilty in women | Women's Health : महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या वाढवतात ही ७ लक्षणं; तरूण मुलींनी वेळीच सावध व्हा

Women's Health : महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या वाढवतात ही ७ लक्षणं; तरूण मुलींनी वेळीच सावध व्हा

Highlightsलठ्ठपणानंग्रस्त असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता कमी होत  जाते.  गर्भधारणेदरम्यान अनेक समस्या येण्याचा धोका असतो.  इतर समस्यापॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम, लठ्ठपणा, वजन कमी होणं, थायरॉईड या समस्यांमुळे ओव्यूलेशन अनियमित होते.  

इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व महिलांमध्ये उद्भवणारी गंभीर समस्या बनत आहे. प्रजनन क्षमता कमी झाल्यानं जोडप्यांना कुटुंब वाढवण्याच्यावेळी आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्यामते महिलांमध्ये इन्फर्टिलिटी येण्याची अनेक कारणं असू शकतात. ओव्यूलेशन डिसॉर्डर, फॅलोपियन ट्यूबवर परिणाम, एंडोमॅट्रियोसिस, युटेरस किंवा सर्विक्सशी निगडीत समस्या, इत्यादी... तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लक्षणांवर वेळीच  लक्ष दिल्यास वेळेवर उपचार करून वंध्यत्वाची समस्या  दूर करता येऊ शकते. डॉक्टरांच्यामते काही लक्षणं महिलांमध्ये सुरूवातीपासूच इन्फर्टिलिटीचे संकेत देतात. 

एंडोमेट्रियोसिस

काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान वेदना होतात तर काहींना अजिबात होत नाहीत. तर काहींची पाळी लवकरत संपत नाही.  एंडोमेट्रियोसिस गर्भाशयात होणारा एक आजार आहे. ज्यामध्ये  गर्भाशयाच्या आतल्या भागातील एन्डोमेट्रियल लेअर्समध्ये वाढ झाल्यानं गर्भाशयाच्या अन्य अंगामध्ये पसरायला सुरूवात  होते. साधारणपणे अंडाशय, फॅलोपियन ट्यूब, पेरिटोनियम, लिफ्ट नोड्समध्ये हा आजार पसरू शकतो.

एंडोमेट्रियोसिस एक सामान्य समस्या आहे. Endometriosis Society Of India नुसार जवळपास २५ मिलियन भारतील महिलांमध्ये  एंडोमेट्रियोसिस झाल्याचं दिसून आलं आहे.  अनेक महिलांना या आजाराच्या तीव्रतेबाबत कल्पना नसते.  १८ ते ३५ वर्ष वयोगटातील महिलांना हा आजार उद्भवतो.  मासिक पाळी दरम्यान अतिप्रमाणात रक्तस्त्राव होणं शरीरसंबंधादरम्यान वेदना जाणवणं, लघवी किंवा शौच करताना वेदना होणं, रक्तस्त्राव होणं, थकवा येणं, चक्कर येणं, गॅस होणं ही लक्षणं दिसून येतात. 

अनियमित मासिक पाळी

अनियमित मासिक पाळी असल्यास इन्फर्टिलिटीची समस्या उद्भवू शकते. अनियमित मासिक पाळीमुळे ओव्हूलेशन वेळेवर होत नाही. पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम, लठ्ठपणा, वजन कमी होणं, थायरॉईड या समस्यांमुळे ओव्यूलेशन अनियमित होते.  

हार्मोनल समस्या

हार्मोन्समध्ये चढ उतार झाल्यानं शरीरात वेगवेगळ्या प्रकरची लक्षणं दिसून येतात. यात पिंपल्स येणं, हात पाय थंड पडणं,  निप्पल्स डिस्चार्च, तोंडावर केसांची वाढ होणं,  केस गळणं, वजन वाढणं अशा तक्रारी उद्भवू शकतात. तुम्हालाही असा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

शरीरसंबंधादरम्यान वेदना

डिस्पेर्युनिया किंवा शरीरसंबंधादरम्यान वेदना झाल्यास महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. इंफेक्शन, एंडोमेट्रियोसिस आणि फाइब्रॉएड या समस्या असल्यास शरीर संबंधादरम्यान वेदना जाणवतात. 

लठ्ठपणा

लठ्ठपणानंग्रस्त असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता कमी होत  जाते.  गर्भधारणेदरम्यान अनेक समस्या येण्याचा धोका असतो. 

इतर समस्या

पीसीओएस, वेळेआधीच मेनोपॉज, कॅन्सर, एंडोमेट्रियोसिस इत्यादी समस्या इन्फर्टिलिटीचं कारण ठरू शकतात. 
हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी, एंडोमेट्रियल बायोप्सी, लॅप्रोस्कोपी, हार्मोन चेकअपसारख्या टेस्टनं इन्फर्टिलिटीचे निदान करता येऊ शकते. 

Web Title: Women's Health : These signs may indicate infertilty in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.