Lokmat Sakhi >Health > लोखंडी भांड्यात चुकूनही शिजवू नका ४ पदार्थ, मधुमेहासह ३ गंभीर आजार होण्याचा धोका अधिक-बिघडेल तब्येत

लोखंडी भांड्यात चुकूनही शिजवू नका ४ पदार्थ, मधुमेहासह ३ गंभीर आजार होण्याचा धोका अधिक-बिघडेल तब्येत

Iron Kadhai Cooking Tips: Never Cook These 4 Foods In It : लोखंडी भांड्यात जेवण तयार करणे कितपत योग्य? पाहा त्यात कोणते पदार्थ तयार करणं ठरू शकते घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 02:59 PM2023-11-21T14:59:55+5:302023-11-21T15:28:59+5:30

Iron Kadhai Cooking Tips: Never Cook These 4 Foods In It : लोखंडी भांड्यात जेवण तयार करणे कितपत योग्य? पाहा त्यात कोणते पदार्थ तयार करणं ठरू शकते घातक

Iron Kadhai Cooking Tips: Never Cook These 4 Foods In It | लोखंडी भांड्यात चुकूनही शिजवू नका ४ पदार्थ, मधुमेहासह ३ गंभीर आजार होण्याचा धोका अधिक-बिघडेल तब्येत

लोखंडी भांड्यात चुकूनही शिजवू नका ४ पदार्थ, मधुमेहासह ३ गंभीर आजार होण्याचा धोका अधिक-बिघडेल तब्येत

बऱ्याच घरांमध्ये लोखंडी भांड्यांचा (Iron Utensils) वापर होतो. लोखंडी तवा, कढई यासह विविध लोखंडी धातूच्या भांड्यांचा वापर होतो. यामध्ये स्टील, पितळं या धातूच्या भांड्यांचा देखील समावेश आहे. पण लोखंडी भांड्यात जेवण तयार करणे कितपत योग्य? आजच्या काळात विविध धातूच्या भांड्यांचा वापर होतो. पण पूर्वीच्या काळी लोकं लोखंडी कढईत भाजी बनवत असत. तर, आजही काही घरांमध्ये लोकं जेवण तयार करण्यासाठी लोखंडी भांड्यांचा वापर करतात.

परंतु, या प्रत्येक भांड्यांमध्ये कोणते पदार्थ करावेत हे ठरलेलं असतं. त्यामुळे लोखंडी भांड्यात कोणते पदार्थ करू नये? याची माहिती पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी दिली आहे. त्यांच्या मते, 'लोखंडी धातूच्या भांड्यांमध्ये तयार केलेलं जेवण खाल्ल्याने, शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढू शकतो'(Iron Kadhai Cooking Tips: Never Cook These 4 Foods In It).

हेमोक्रोमॅटोसिसचा धोका

लोखंडाच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने, हेमोक्रोमॅटोसिस नावाचा आजार होऊ शकतो. कारण शरीर अन्नातून मोठ्या प्रमाणात लोह शोषण्यास सुरुवात करते. यामुळे यकृताचे आजार, हृदयरोग आणि मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

लग्न जवळ आलं पण अद्यापही वजन कमी झाले नाही? लाईफस्टाईलमध्ये करा ८ सोपे बदल, वजन होईल झरझर कमी

लिंबूयुक्त पदार्थ

जर आपण लोखंडी भांड्यात लिंबूयुक्त पदार्थ किंवा लोणचं तयार करत असाल तर, वेळीच थांबा. कारण लिंबाच्या रसाचे आम्लयुक्त स्वरूप लोहावर रिअॅक्शन देऊ शकते. ज्यामुळे पदार्थाला लोखंडी धातूचा स्वाद येऊ शकते. ज्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.

गोड पदार्थ

लोखंडी भांड्यांमध्ये हलवा किंवा शिरा तयार करू नये. लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने, त्या पदार्थाला लोखंडी धातूची चव येऊ शकते. ज्यामुळे पदार्थाचा स्वाद बिघडू शकतो. अशा वेळी गोड पदार्थ नेहमी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात तयार करावे.

८ तास नोकरी-२ तास प्रवास-व्यायाम कधी करणार? फक्त २० मिनिटं करा शतपावली, बघा वजनाची जादू

टोमॅटो

टोमॅटोच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे लोखंडी धातूवर रिअॅक्ट करू शकते. यामुळे अन्नाची चव आणि पोत दोन्ही बिघडू शकते. त्यामुळे लोखंडी भांड्यात टोमॅटोयुक्त पदार्थ करणे टाळा.

नूडल्स आणि पास्ता

लोखंडी भांड्यात नूडल्स आणि पास्ता करणे टाळा. नूडल्स आणि पास्ता तयार करताना आपण पाहिलं असेल की ते लोखंडी पॅनवर चिकटकात. यामुळे अन्नाचा पोत तर बिघडतोच पण त्याचा स्वाद आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे नूडल्स, पास्ता, फ्राईड राईस, पिझ्झा यांसारखे पदार्थ लोखंडी भांड्यात तयार करणे टाळा.

Web Title: Iron Kadhai Cooking Tips: Never Cook These 4 Foods In It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.