Lokmat Sakhi >Health > प्रेशर कूकरमध्ये डाळ-भात शिजवणं योग्य की अयोग्य? ICMR सांगते, प्रेशर कूकर वापरत असाल तर..

प्रेशर कूकरमध्ये डाळ-भात शिजवणं योग्य की अयोग्य? ICMR सांगते, प्रेशर कूकर वापरत असाल तर..

Is it healthy to cook rice and dal in pressure cooker? : प्रेशर कूकरमध्ये अन्न शिजवण्यापूर्वी २ गोष्टी लक्षात ठेवा..पौष्टिक मूल्य कमी होणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 02:32 PM2024-05-16T14:32:37+5:302024-05-16T17:12:49+5:30

Is it healthy to cook rice and dal in pressure cooker? : प्रेशर कूकरमध्ये अन्न शिजवण्यापूर्वी २ गोष्टी लक्षात ठेवा..पौष्टिक मूल्य कमी होणार नाही..

Is it healthy to cook rice and dal in pressure cooker? | प्रेशर कूकरमध्ये डाळ-भात शिजवणं योग्य की अयोग्य? ICMR सांगते, प्रेशर कूकर वापरत असाल तर..

प्रेशर कूकरमध्ये डाळ-भात शिजवणं योग्य की अयोग्य? ICMR सांगते, प्रेशर कूकर वापरत असाल तर..

स्वयंपाकघरात आपण प्रेशर कूकरचा (Pressure Cooker) वापर करतोच. त्यामध्ये पदार्थ झटपट शिजतात . शिवाय स्वयंपाक करण्याचं वेळखाऊ काम झटपट होते. बहुतांश लोक प्रेशर कूकरमध्ये डाळ आणि तांदूळ (Daal-Rice) शिजत घालतात. शिवाय काही जण त्यात भाजी देखील तयार करतात. पण प्रेशर कुकरमध्ये तयार केलेलं अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरतं, असं म्हटलं जातं, हे कितपत खरं? प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या अन्नातील पौष्टीक घटक कमी होते का? भांड्यात अन्न शिजवण्याची पद्धत उत्तम आहे का? 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनद्वारे नुकत्याच जाहीर केलेल्या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे २०२४ नुसार, 'डाळ, तांदूळ, आणि धान्यांमध्ये काही पौष्टीक घटक आढळतात. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्यानंतर तुटतात. याशिवाय फायटिक ॲसिडसारखे घटकही कमी होतात, त्यामुळे अन्न पचवण्याची आणि झिंक, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे शोषून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रेशर कुकिंग फायदेशीर ठरते'(Is it healthy to cook rice and dal in pressure cooker?).

प्रेशर कूकरमध्ये डाळ-तांदूळ शिजत घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

- प्रेशर कूकरमध्ये डाळ - तांदूळ शिजत घालताना त्यात योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करा. कमी पाणी झाल्यास अन्न व्यवस्थित शिजणार नाही. जास्त झाल्यास धान्यातील पौष्टीक घटक कमी होऊ शकते.

नारळाची गारेगार कुल्फी घरीच करा, पाहा खास चव, बाहेरचे टेंडर कोकोनट आईस्क्रीम विसराल

- प्रेशर कूकरच्या जास्त शिट्या होऊ देऊ नका. यामुळे धान्यातील प्रोटीनची गुणवत्ता कमी होते. शिवाय  लायसिन सारखे पोषक घटक कमी होऊ शकतात.

प्रेशर कूकरमध्ये अन्न शिजवण्याचे फायदे

जर्नल ऑफ सायन्स ऑफ फूड अँड ॲग्रीकल्चरने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, 'प्रेशर कुकिंगमुळे अन्नातील लॅक्टिनचे प्रमाण कमी होते. लॅक्टिन हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे प्रथिने आहे. जे बहुतांश वनस्पतींमध्ये आढळतात. ते खनिजांच्या शोषणात अडथळा आणून अन्नाचे पौष्टिक मूल्य कमी करू शकतात. त्यामुळे काही ठराविक पदार्थ आपण प्रेशर कूकरमध्ये तयार करू शकतात.'

साउथमध्ये घरोघरी जसं दही खातात, ‘तसं’ खा, बॅड कोलेस्टेरॉल विसरा आणि वजनही होईल कमी

तर, सेंट्रल कॉन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी, नवी दिल्लीचे संचालक डॉ. राघवेंद्र राव एम यांनी  न्यूज १८ हिंदीशी बोलताना सांगितले की, प्रेशर कुकिंग ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वाफेद्वारे अन्न शिजवले जाते. जर आपण प्रेशर कूकरमध्ये अन्न शिजवत असाल तर, त्यातील हार्ड एन्झाईम्स, स्टार्च तुटतात. ज्याचे तोडणे पचनासाठी आणि पोषक तत्वे बाहेर पडण्यासाठी आवश्यक असतात. प्रेशर कुकिंगमुळे कडधान्ये किंवा धान्यांमधील प्रथिने, जीवनसत्त्वे इत्यादी पोषक घटक बाहेर येतात, हे अन्न खाल्ल्याने शरीराला पूर्ण पोषण मिळते.

Web Title: Is it healthy to cook rice and dal in pressure cooker?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.