खराब जीवनशैलीमुळे आपण हळूहळू धोकादायक आजारांच्या विळख्यात अडकतो. वाईट जीवनशैलीसोबत ताण तणावही या आजारांना कारणीभूत ठरते. मधुमेह हा या आजारांपैकी एक आहे. जो मुळापासून नष्ट करता येत नाही. काही उपायांच्या मदतीने तो फक्त नियंत्रणात ठेवता येतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासोबतच, साखरेच्या सेवनाचे प्रमाणही कमी करावे लागते. पण गोड पदार्थ सोडल्याने मधुमेहाचा धोका टळतो का? साखर खाल्ल्याने मधुमेह होतो का?(Is it possible to get diabetes by not consuming sugar?).
यासंदर्भात, एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. स्वप्नील कुमार सांगतात, ''गोड खाल्ल्याने सामान्य लोकांना मधुमेह होईल असे नाही. शरीरातील साखरेची पातळी वाढणे व इन्शुलिनचे जास्त उत्पादनामुळे मधुमेहाचा आजार होतो. यासह जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो, ज्यामुळे नंतर मधुमेह हा आजार होण्याची शक्यता वाढते. पण जर एखादी व्यक्ती गोड पदार्थ खात असेल आणि नियमित व्यायाम करत असेल तर, त्या व्यक्तीला मधुमेह होणार नाही.''
तणावामुळेही मधुमेह होतो
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ''तणाव हे देखील मधुमेहाचे एक कारण आहे. वाढत्या ताणामुळे कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्याने इन्शुलिनची पातळी घसरू लागते. अशा स्थितीत आपल्या शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते. या कारणामुळे एड्रिनल ग्रंथितील ग्लुकोजची पातळी वाढते. व आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या खराब होण्याचा धोका निर्माण होतो.''
वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेसदेखील ठरतो सर्वात मोठा शत्रू, डायबिटिस असेल तर सावधान..
मधुमेह कसे नियंत्रित करावे
मधुमेहग्रस्त लोकांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करणे हे सर्वात मोठे टास्क आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकस आहार घेण्याबरोबरच व्यायाम करणे गरजेचं. याशिवाय वजनही नियंत्रणात ठेवले पाहिजे.