Lokmat Sakhi >Health > चपात्या पटकन होण्यासाठी थेट आचेवर शेकता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? तज्ज्ञ सांगतात....

चपात्या पटकन होण्यासाठी थेट आचेवर शेकता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? तज्ज्ञ सांगतात....

Is it safe to cook roti directly on gas flame : अलिकडेच चपातीबाबत एक रिसर्च समोर आला आहे. यानुसार गॅसवर थेट आचेवर चपाती शेकल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:28 PM2023-04-04T12:28:58+5:302023-04-04T13:45:54+5:30

Is it safe to cook roti directly on gas flame : अलिकडेच चपातीबाबत एक रिसर्च समोर आला आहे. यानुसार गॅसवर थेट आचेवर चपाती शेकल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो.

Is it safe to cook roti directly on gas flame : Is cooking roti on direct gas flame bad and cause cancer read what research has to say | चपात्या पटकन होण्यासाठी थेट आचेवर शेकता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? तज्ज्ञ सांगतात....

चपात्या पटकन होण्यासाठी थेट आचेवर शेकता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? तज्ज्ञ सांगतात....

चपाती आपल्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. भारतीयांच्या ताटात चपाती  नसेल असं क्वचितच होतं. भाकरी, नान पराठ्यांपेक्षा चपाती बनवणं सोपं असतं. चटणी असो किंवा भाजी चपाती कोणत्याही पदार्थांसह चपाती चवदार लागते. अनेक घरांमध्ये चपाती अर्धवट शिजल्यानंतर चिमट्याच्या मदतीनं गॅसवर शेकली जाते. यामुळे कमीत कमी वेळात टम्म फुगलेली चपाती तयार होते. 
चपाती बनण्याची ही कॉमन पद्धत आहे. पण अशी चपाती खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. (Is cooking roti on direct gas flame bad and cause cancer read what research has to say)

अलिकडेच चपातीबाबत एक रिसर्च समोर आला आहे. यानुसार गॅसवर थेट आचेवर चपाती शेकल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो. जर्नल इन्वॉरमेंट सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार गॅस स्टोव्हमधून असे एअर पोल्यूटंट उत्सर्जित होतात ज्याला जागतिक आरोग्य संघटनेनं धोकादायक समजले आहे. हे पोल्यूटेंट कार्बन मोनो ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आहेत. जे श्वास आणि हृदयाच्या आजारांचा धोका निर्माण करतात. इतकंच नाही तर यामुळे कॅन्सरचाही धोका उद्भवतो. 

न्युट्रिशन एंड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार हाय फ्लेमवर जेवण बनवल्यास कार्सिनोजेनिक घटक निर्माण होतात.  ज्यामुळे शरीराच्या विविध अंगावर परिणाम होऊ शकतो.  आधी चपाती तव्यावर ठेवून त्यावर कापडानं दाबून शेकल्या जात असतं. यामुळे चपात्या गॅसच्या आचेच्या संपर्कात येत नव्हत्या. यामुळे तव्यावर चपात्या केल्यानं चवीवर परिणाम होत होता.  पण चिमट्याच्यानं आचेवर चपात्या शेकल्यानं कमीत कमी वेळात जास्त चपात्या बनवता येतात. यामुळे चपात्या  मंद आचेवर शेकल्या तरी कच्च्या राहत नाहीत. 

बाळांतपणानंतर सुटलेलं पोट काही केल्या कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात ५ टिप्स; पोट होईल कमी

थेट आचेवर चपात्या शेकल्यान कार्सिनोजेन बाहेर पडते

फूड स्टॅण्डर्ड ऑस्ट्रेलिया अँड न्युजीलँण्डच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. पॉल ब्रेंट यांच्याकडून २०११ मध्ये एक  रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. यानुसार  चपाती  जेव्हा गॅसच्या फ्लेमच्या संपर्कात येते. तेव्हा एक्रिमालाईट नावाचे रसायनाचे उत्पादन होते. हा अहवाल जळालेल्या टोस्टबद्दल होता. पण गव्हाच्या पिठात काही प्रमाणात नैसर्गिक साखर आणि प्रथिने देखील असतात. जी थेट आचेवर गरम केल्यास कर्करोगजन्य पदार्थ निर्माण होऊ शकतात, जे मानवांसाठी अजिबात सुरक्षित नाही.

आकडेवारीनुसार आचेवर शेकलेली चपाती आरोग्यासाठी अजिबात सुरक्षित नसते. यामुळे जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढतो. याबाबत अजून संशोधन केलं जाणार आहे. यात कितपत सत्यता आहे याबाबत अजूनही अभ्यास करण्याची गरज आहे.  जेव्हा मीट, मासे  पोल्ट्री उत्पादनांना उच्च तापमानावर शिजवले जाते तेव्हा कार्सिनोजेनिक पदार्थ तयार होतात आणि कॅन्सरचा धोका वाढतो. 

 गॅसवर फुलके-भाकरी भाजणं हे आरोग्यासाठी चांगलं की वाईट

मराठी विज्ञान परीषदेचे माजी अध्यक्ष विनय र.र यांना विचारले असता या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरीकांनी अजिबात काळजी करु नये असेही त्यांनी सांगितले. काही वेळा गॅस सुरू केला आणि तो पेटवला नाही तर त्याचा वास येतो. मात्र तो पेटवल्यानंतर ऑक्सिडाईज होऊन तो वास निघून जातो. त्यामुळे थेट गॅसवर फुलके किंवा भाकरी भाजली तर काहीच हरकत नाही.

त्यामुळे सोशल मीडियावर काही मिसगाईड करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवे. दिवसागणिक अशा असंख्य गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आरोग्याच्या गोष्टीबाबत आपण थोडे गांभिर्याने घेतो. मात्र योग्य ती खातरजमा केल्याशिवाय अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. 
 

Web Title: Is it safe to cook roti directly on gas flame : Is cooking roti on direct gas flame bad and cause cancer read what research has to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.