Lokmat Sakhi >Health > सोशल मीडियावर तासंतास वेळ वाया जातो हे कळतं पण उपाय काय? ७ स्मार्ट सूत्र, स्क्रोलिंग कमी

सोशल मीडियावर तासंतास वेळ वाया जातो हे कळतं पण उपाय काय? ७ स्मार्ट सूत्र, स्क्रोलिंग कमी

7 Simple Ways to Spend Less Time on Social Media : सोशल मीडियात वाया जाणारा वेळ कमी करुन उत्तम काम करणं तर आपल्याच हातात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 05:20 PM2022-12-08T17:20:30+5:302022-12-08T17:24:06+5:30

7 Simple Ways to Spend Less Time on Social Media : सोशल मीडियात वाया जाणारा वेळ कमी करुन उत्तम काम करणं तर आपल्याच हातात आहे.

It is known that hours of time are wasted on social media but what is the solution? 7 Smart formulas, less scrolling | सोशल मीडियावर तासंतास वेळ वाया जातो हे कळतं पण उपाय काय? ७ स्मार्ट सूत्र, स्क्रोलिंग कमी

सोशल मीडियावर तासंतास वेळ वाया जातो हे कळतं पण उपाय काय? ७ स्मार्ट सूत्र, स्क्रोलिंग कमी

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात व शेवट सोशल मीडिया पाहतच होते. अनेकांना दर मिनिटाला त्यांना फोन चेक करण्याची इच्छा होते. स्क्रोलिंग आणि सर्फिंग करताना इतका वेळ खर्ची पडते की यामुळे जीवनातील इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर धोकादायक परिणाम होतो. पण मग तिथं जाणारा वेळ कमी कसा करायचा? (7 Simple Ways to Spend Less Time on Social Media).

 

काय काय करता येईल?

१. अशी करा दिवसाची सुरुवात - काही लोकांना झोपेतून उठताच सोशल मिडिया साईट्सवर सर्फिंग करायची सवय असते. परंतु असे न करता दिवसाची सुरुवात योगा किंवा व्यायामाने करावी. ज्याने तुम्हाला फ्रेश वाटेल व दिवसाची सुरुवात चांगली झाल्याने संपूर्ण दिवस चांगला जाईल. 

२. अ‍ॅप्सचा कमी वापर - मोबाईलच्या होम स्क्रीनवर जेवढे गरजेचे अ‍ॅप्स आहेत तेवढेच ठेवा. गरजेपेक्षा जास्त अ‍ॅप्स ठेवल्याने त्यांचे सततचे अपडेट व नोटिफिकेशन्स बघण्यात बराच वेळ जातो. 

३. वेळेचे गणित - तुम्ही दिवसातील २४ तासांपैकी एकूण किती वेळ सोशल मिडीयावर घालवता याची नोंद ठेवा. जेणेकरून आपला किती वेळ वाया जात आहे याचा तुम्हाला अंदाज बांधता येईल. 

४. गॅझेट्सशिवाय एक दिवस - आठवड्यातील एक दिवस असा ठरवा कि त्या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचे गॅजेट किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणार नाही. पडतो 

५. वेळेची मर्यादा आखा - दिवसांतील काही मोजके तासच सोशल मिडीयाचा वापर करा. उदा. दर ३ तासातून १५ मिनिटेच सोशल मिडीयाचा वापर करा. जेणेकरून दिवसातील किती तास आपण सोशल मीडियासाठी देणार आहोत हे आपल्या लक्षात येते. 

६. वाचनाची सवय - आवडत्या विषयाचे एखादे पुस्तक नेहेमी सोबत ठेवा. प्रवासादरम्यान किंवा मोकळ्या वेळेत सोशल मिडीया साईट्सवर सर्फिंग करण्यापेक्षा वाचनाची सवय लावून घ्या.    

७. छंद जोपासा - सोशल मिडीयावर बराच वेळ वाया घालविण्यापेक्षा एखादा आवडता छंद जोपासा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. रोजच्या कामात तुमची आवड जोपासायला वेळ मिळत नसेल तर अश्या फावल्या वेळात आपले आवडते काम करा.

Web Title: It is known that hours of time are wasted on social media but what is the solution? 7 Smart formulas, less scrolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.