Lokmat Sakhi >Health > करिना कपूरचीही झाली बाळंतपणानंतर दमछाक, पोस्ट पार्टम फिटनेससाठी तिने काय केलं ?

करिना कपूरचीही झाली बाळंतपणानंतर दमछाक, पोस्ट पार्टम फिटनेससाठी तिने काय केलं ?

बाळांतपण झाल्यानंतर स्त्री खरोखरंच खूप थकून गेलेली असते. बाळाचे आरोग्य आणि तिची स्वत:ची तब्येत या दोन्ही गोष्टी एकाचवेळी बघणं खूपच कसरतीचं होऊन जातं. बॉलीवुड अभिनेत्री करिना कपूरचीही बाळंतपणानंतर दमछाक होत आहे. पण स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी ती काय करतेय बरं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 05:44 PM2021-07-13T17:44:14+5:302021-07-13T19:08:35+5:30

बाळांतपण झाल्यानंतर स्त्री खरोखरंच खूप थकून गेलेली असते. बाळाचे आरोग्य आणि तिची स्वत:ची तब्येत या दोन्ही गोष्टी एकाचवेळी बघणं खूपच कसरतीचं होऊन जातं. बॉलीवुड अभिनेत्री करिना कपूरचीही बाळंतपणानंतर दमछाक होत आहे. पण स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी ती काय करतेय बरं ?

Kareena Kapoor Khan's health tips after second delivery, what did she do for post-partum fitness? | करिना कपूरचीही झाली बाळंतपणानंतर दमछाक, पोस्ट पार्टम फिटनेससाठी तिने काय केलं ?

करिना कपूरचीही झाली बाळंतपणानंतर दमछाक, पोस्ट पार्टम फिटनेससाठी तिने काय केलं ?

Highlightsबाळांपणानंतर होणारी शारीरीक हानी भरून काढण्यासाठी महिलांनी सगळ्यात आधी तर आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे.बाळाचे आरोग्य आणि स्वत:ची तब्येत या दोन्ही गोष्टी एकाचवेळी बघणं खूपच कसरतीचं होऊन जातं.

पोस्ट पार्टम फिटनेस म्हणजे बाळांतपणानंतर आपला गेलेला फिटनेस प्रयत्न पुन्हा मिळवणे. दुसऱ्या बाळांतपणानंतर अभिनेत्री करिना कपूर सध्या याच अवस्थेतून जात आहे. डाएट, वेटलॉस आणि इतर काही आरोग्य विषयक गोष्टी ती नेहमीच तिच्या सोशल मिडियावरून शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीच करिनाने पोस्ट पार्टम फिटनेसविषयीही काही गोष्टी शेअर केल्या होत्या. यामध्ये बाळांतपणानंतर आलेला थकवा याचा तिने स्पष्ट उल्लेख केला होता. 

 

या पोस्टमध्ये करिना म्हणतेय की, २००६ पासून ती नियमितपणे योगा करते. योगाचा एवढा सराव असूनही  आता दुसऱ्या बाळांतपणानंतर मात्र योगा करताना अंग दुखते आहे,  खूप त्रास होतो आहे आणि प्रचंड अशक्तपणाही आला आहे. 

बाळांतपणानंतर असा थकवा खूप बायकांना येत असतो. पहिल्या बाळांतपणात तरी शरीरात तुलनेने अधिक ताकद असते. परंतू दुसऱ्या बाळांतपणानंतर मात्र थोडे वयही वाढलेले असल्याने अंगातली शक्ती खूपच कमी होऊन जाते. अशातच दोन्ही अपत्यांच्या संगोपनाकडेही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे बाळांपणानंतर होणारी शारीरीक हानी भरून काढण्यासाठी महिलांनी सगळ्यात आधी तर आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याच बरोबरीने स्वत:च्या फिटनेसला प्राधान्य दिले पाहिजे. 

 

योगा आहे बेस्ट
बाळांतपणानंतर गेलेला फिटनेस पुन्हा आणण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा योगा सगळ्यात प्रभावी ठरतो, असेही करिना कपूरने सांगितले आहे. ती म्हणते की बाळांतपणानंतर मी व्यायामाला हळू हळू सुरूवात सुरूवात केली. पण थोडा असला तरी त्यातली नियमितता जपली. व्यायामाचा वेळ हा फक्त माझा एकटीचा असताे. त्यामुळे मला स्वत:विषयी विचार करायला वेळ मिळताे. 

 

पहिल्या बाळांतपणानंतर करिना होती ॲक्टीव्ह
आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर करिना आताएवढी थकलेली नव्हती. मुलगा तैमूरच्या जन्मानंतर तिने अवघ्या एका महिन्यातच पुन्हा कामाला सुरूवात केली होती. बाळांपणानंतर वेटलॉसचे ध्येयही तिने खूपच कमी वेळात गाठले होते. आता परत एकदा करिना हा फिटनेस पुन्हा मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. 

 

Web Title: Kareena Kapoor Khan's health tips after second delivery, what did she do for post-partum fitness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.