योनीतून होणारा स्त्राव योनिमार्गाच्या संसर्गापासून रक्षण करतो. हा स्त्राव म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज. व्हाईट डिस्चार्जला शास्त्रीय भाषेत ल्युकोरिया असे म्हणतात. मासिक पाळीदरम्यान व्हाईट डिस्चार्ज होणे सामान्य आहे. पण अधिक प्रमाणात हा त्रास सहन करावा लागत असेल तर, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. व्हाईट डिस्चार्जमुळे पाठदुखी, मूड स्विंग्ज, कॅल्शियमची कमतरता अशा तक्रारी जाणवतात.
जर व्हाईट डिस्चार्ज होताना चिपचीपीतपणा जाणवणे, योनीमार्गात खाज सुटणे यासारख्या गोष्टी होत असतील तर, यामागे हार्मोनल असंतुलन असू शकतं. जर व्हाईट डिस्चार्जचा त्रास सुरवातीच्या स्टेजमध्ये असेल तर, एक घरगुती उपाय करून पाहा. याची माहिती आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिली आहे(Know all about ‘tandulodaka’, the Ayurvedic remedy for UTI, white discharge, burning sensation when urinating).
व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी
व्हाइट डिस्चार्ज कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. याला आयुर्वेदात तंदुलोदक असे म्हणतात. त्यात भरपूर प्रमाणात स्टार्च आणि आवश्यक अँटी-ऑक्सिडंट असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
कशाला हवा टूथब्रश? बोटाने दात घासले तर काय बिघडतं? डेंटिस्ट सांगतात..
तांदळाचे पाणी तयार कसे करायचे?
- एका मातीच्या किंवा स्टीलच्या भांड्यात एक वाटी तांदूळ घ्या, त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात ८ कप पाणी घालून भिजत ठेवा.
- ६ तासापर्यंत झाकण ठेऊन तांदूळ भिजत ठेवा. ६ तासानंतर भिजलेले तांदूळ चांगले मॅश करा. साधारण २ ते ३ मिनिटे असे करा. नंतर चहाच्या गाळणीने पाणी गाळून वेगळे करा. व हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा. आपण हे पाणी दिवसभर पिऊ शकता.
इतर फायदे
- तांदळाच्या पाण्याचा वापर आपण स्किन आणि केसांसाठी देखील करू शकता. यामुळे यांना नैसर्गिक फायदा होतो.
- डॉक्टरांच्या मते तांदळाचे पाणी थंड असते. त्यामुळे लघवीची जळजळ, जुलाब, तळवे गरम होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
लिंबू जास्त खाल्ल्याने खरेच वजन कमी होते का? लिंबू आहारात किती असावा?
- तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल असते, जे रक्त प्रवाह सुधारते आणि वृद्धत्व कमी करते. आपण तांदळाचे पाणी एनर्जी ड्रिंक म्हणूनही घेऊ शकता.