Lokmat Sakhi >Health > खुपते तिथे दुखते, मनातल्या भावनांमुळे ठणकतात शरीराचे अवयव! तुम्हाला नक्की काय छळतंय?

खुपते तिथे दुखते, मनातल्या भावनांमुळे ठणकतात शरीराचे अवयव! तुम्हाला नक्की काय छळतंय?

Know How Different Emotions could affect different Part of the Body : आपल्या भावनांचे आवेग, कुचंबणा यामुळेही आपल्याला अनेक आजार होतात हे माहित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 11:52 AM2023-07-21T11:52:28+5:302023-07-21T12:24:16+5:30

Know How Different Emotions could affect different Part of the Body : आपल्या भावनांचे आवेग, कुचंबणा यामुळेही आपल्याला अनेक आजार होतात हे माहित आहे का?

Know How Different Emotions could affect different Part of the Body : Do you know which parts of the body affect each emotion of anger, fear, happiness? | खुपते तिथे दुखते, मनातल्या भावनांमुळे ठणकतात शरीराचे अवयव! तुम्हाला नक्की काय छळतंय?

खुपते तिथे दुखते, मनातल्या भावनांमुळे ठणकतात शरीराचे अवयव! तुम्हाला नक्की काय छळतंय?

आपल्या भावना आपल्या शरीरावर परीणाम करत असतात हे आपल्याला माहित आहे. आपण जसा विचार करतो त्याचा आपल्या प्रत्येक पेशीवर, अवयवावर आणि एकूणच आपल्यावर प्रभाव पडत असतो. आपण नकारात्मक विचार करत असू तर नकळत आपली तब्येत खराब व्हायला लागते. काही ना काही आजार विनाकारण मागे जडत जातात. सतत ताण घेतल्याने डायबिटीस, बीपीच्या समस्या उद्भवतात हे आपल्याला माहित आहे. प्रमाणापेक्षा जास्त चिडचिड झाली तर आहारात विशेष बदल नसले तरी आपल्याला अॅसिडीटी होते आणि पोटाच्या तक्रारी निर्माण होतात हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच आपल्या मानसिकतेचा, भावनांचा आपल्या मनावर परीणाम होत असतो हे नक्की. पण कोणत्या प्रकारच्या भावना आपल्या कोणत्या अवयवांवर परीणाम करतात याविषयी समजून घेऊया (Know How Different Emotions could affect different Part of the Body)...

१. आपल्याला खूप जास्त राग येत असेल तर त्याचा कळत नकळतपणे आपल्या लिव्हर म्हणजेच यकृतावर परीणाम होतो. यकृताचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे असते. 

२. अनेकांना खूप जास्त विचार करण्याची सवय असते. तसेच लहानातील लहान गोष्टीचीही हे लोक खूप काळजी करतात. असे करण्याने पोटाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. एकदा पोट बिघडले की संपूर्ण आरोग्यावर त्याचा परीणाम होतो. 

३. निराशा किंवा दु:ख ही अतिशय सामान्य भावना आहे. आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली नाही किंवा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याशी चुकीचे वागली की आपण खूप निराश होतो आणि आपल्याला दु:खही होते. मात्र त्याचा आपल्या फुफ्फुसांवर विपरीत परीणाम होतो. 

४. आपल्याला आयुष्यभर कशाची ना कशाची भिती असते. समोर ही भिती दिसत नसली तरी मनाच्या आत कुठेतरी ती दडलेली असण्याची शक्यता असते. ही भिती प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्याचा किडणीच्या आरोग्यावर परीणाम होतो. 

५. राग, भिती, दु:ख या भावना जशा उफाळून येतात त्याचप्रमाणे आनंदही अनेकदा उफाळून येतो. काही वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे खूपच जास्त आनंद होतो. अशाप्रकारे आनंद झाला तर हृदयातील ऊर्जेला त्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता असते. 


 

Web Title: Know How Different Emotions could affect different Part of the Body : Do you know which parts of the body affect each emotion of anger, fear, happiness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.