Lokmat Sakhi >Health > रजनीकांत इस्पितळात, त्यांना झालेला रक्तवाहिन्यांचा आजार आहे काय? ‘तसा’ त्रास होऊ नये म्हणून काय कराल

रजनीकांत इस्पितळात, त्यांना झालेला रक्तवाहिन्यांचा आजार आहे काय? ‘तसा’ त्रास होऊ नये म्हणून काय कराल

Know the reason behind admission of rajanikanth in hospital : रोजच्या धावपळीत स्वत:कडे केलेले दुर्लक्ष पडेल महागात, रक्तवाहिन्याही सुजतात आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 01:26 PM2024-10-03T13:26:53+5:302024-10-03T15:15:40+5:30

Know the reason behind admission of rajanikanth in hospital : रोजच्या धावपळीत स्वत:कडे केलेले दुर्लक्ष पडेल महागात, रक्तवाहिन्याही सुजतात आणि..

Know the reason behind admission of rajanikanth in hospital : Rajinikanth at the hospital, did he have a blood vessel disease? What will you do to avoid 'such' trouble? | रजनीकांत इस्पितळात, त्यांना झालेला रक्तवाहिन्यांचा आजार आहे काय? ‘तसा’ त्रास होऊ नये म्हणून काय कराल

रजनीकांत इस्पितळात, त्यांना झालेला रक्तवाहिन्यांचा आजार आहे काय? ‘तसा’ त्रास होऊ नये म्हणून काय कराल

अभिनेते रजनीकांत यांना २ दिवसांपूर्वी अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाचा त्रास झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. एकाएकी असे काय झाले की रजनीकांतला रुग्णालयात दाखल व्हावे लागले हा प्रश्न अर्थात त्यांच्या चाहऱ्यांना पडला. आता ते बरे आहेत त्यांना शुक्रवारी दवाखान्यातून घरी सोडण्यातही येईल. पण मुळात त्यांना नेमका त्रास काय झाला हे कळलं तर आपण सर्वांनीही तब्यतेची किती काळजी घ्यायला हवी हे कळेल. (Know the reason behind admission of rajanikanth in hospital).

 रजनीकांत यांना रक्तदाबामुळे काही विशिष्ट त्रास झाला असे समजते. त्यांच्या रक्तवाहिन्यांना सूज आली होती. हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना सूज आल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. सर्जिकल प्रोसिजर न करता उपचाराने आता त्यांना बरे वाटते आहे असे त्यांच्या डॉक्टरचे म्हणणे आहे. पण रक्तवाहिन्यांना सूज येणं, रक्तदाब हा प्रकार नेमका काय असतो, तो टाळता येऊ शकतो का?
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा शब्द आपण हल्ली अगदी सहज ऐकतो. वयाच्या ऐन तिशीत किंवा चाळिशीत रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्या असल्याचे आजुबाजूला पाहतोही.

हे सारं का होतं? काय करावं? 

(Image : Google)
(Image : Google)


१. तुम्ही चाळिशीच्या आत असाल तरी दर ३ वर्षांनी तुम्ही स्वत:चा रक्तदाब तपासायला हवा. चाळिशी उलटली असेल तर वर्षातून एकदा रक्तदाब तपासायला हवा. कारण वाढता ताण हे रक्तदाब होण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. रक्तदाब वाढला की त्याचा शरीरातील रक्तवाहिन्यांवर परीणाम होतो आणि त्यामुळे हृदयाशी निगडीत किंवा अन्य समस्या निर्माण होतात. 

२.रक्तदाब ८०-१२० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही आहारातील मीठाचे प्रमाण त्वरीत कमी करायला हवे. आपण रोजच्या अन्नपदार्थातून जे मीठ खातो त्याबाबत विशेष चिंता करण्याची गरज नाही. पण लोणची, पापड आणि वेफर्स यामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळायला हवे. 

३. रजनीकांत यांना Aorotic aneurysm ही समस्या झाली आहे. Aorota ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी असते. या वाहिनीवर ताण येतो तेव्हा ही समस्या उद्भवते. आता हा ताण येतो म्हणजे नेमके काय तर आपल्या रक्तदाबाचा या वाहिनीवर परीणाम होतो आणि तिच्या कार्यात अडथळे येतात. मग रुग्णालयात जाऊन योग्य ते उपचार करुनच हे अडथळे दूर करावे लागतात. मात्र हे सगळे अतिशय गुंतागुंतीचे असते आणि वेळीच उपचार मिळाले तर ठीक होते नाहीतर जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त असते.


Web Title: Know the reason behind admission of rajanikanth in hospital : Rajinikanth at the hospital, did he have a blood vessel disease? What will you do to avoid 'such' trouble?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.