Lokmat Sakhi >Health > 'शिळं खाल्लं तर काय बिघडतं'-असा विचार करून उरलेला भात गरम करून खाता? मग हे नक्की वाचा

'शिळं खाल्लं तर काय बिघडतं'-असा विचार करून उरलेला भात गरम करून खाता? मग हे नक्की वाचा

Leftover Rice Eating Side Effects (Shila bhat ka khau nye) : जर तुम्ही शिळा भात किंवा ३ ते ४ दिवसांचा उरलेला भात खात असाल तर ही सवय तुमच्यासाठी महागात पडू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:22 PM2023-12-11T16:22:09+5:302023-12-12T15:15:40+5:30

Leftover Rice Eating Side Effects (Shila bhat ka khau nye) : जर तुम्ही शिळा भात किंवा ३ ते ४ दिवसांचा उरलेला भात खात असाल तर ही सवय तुमच्यासाठी महागात पडू शकते.

Leftover Rice Eating Side Effects : Is it safe to eat leftover rice Leftover rice can cause food poisoning | 'शिळं खाल्लं तर काय बिघडतं'-असा विचार करून उरलेला भात गरम करून खाता? मग हे नक्की वाचा

'शिळं खाल्लं तर काय बिघडतं'-असा विचार करून उरलेला भात गरम करून खाता? मग हे नक्की वाचा

भारतासारख्या राज्यात तांदूळ, गहू मोठया  प्रमाणात खाल्ले जातात. (Health Tips) अनेकजण दिवसभरातून फक्त एकदाच भात खातात. भातात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटामीन आणि खनिज अशी पोषक तत्व भरपूर असतात जी शरीरासाठीही फायदेशीर ठरतात. पण बाकीच्या प्रोटीन्स, व्हिटामीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश न करता फक्त भात खाल्ला तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. भात खाल्ल्याने शरीराल ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Is It OK to Eat Leftover Rice)

भात खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.  तांदूळ शरीराला उर्जा देतो आणि पोटभर जेवल्याचा फिलही येतो. तांदूळ  एलर्जीचे कारणही ठरू शकतो.  (Food Poisoning from Rice Is a Real Thing) जर तुम्ही शिळा भात किंवा ३ ते ४ दिवसांचा उरलेला भात खात असाल तर ही सवय तुमच्यासाठी महागात पडू शकते. शिळा भात खाण्याची सवय तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकते. (Can You Really Get Food Poisoning From Leftover Rice)

शिळा भात खाण्याचे  साईट इफेक्ट्स (Side Effects of Eating Leftover Rice)

 नॅशनल हेल्थ सर्विसच्या रिपोर्टनुसार वारंवार शिळा भात खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण शिळा भात खाल्ल्याने पोट आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. शिळा भाताच्या सेवनाने बॅक्टेरियाज वाढतात ज्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. डायरिया, जुलाब, उलटी यांसारख्या समस्या उद्भवतात शिळा भात हृदयाच्या आजारांचे कारण ठरू शकतो. 

पोट, मांड्याची चरबी खूपच सुटलीये? रिकाम्या पोटी 'हा' पदार्थ घ्या, वजन घटेल-२८ ची होईल कंबर

उरलेला भात खाल्ल्याने शरीराला अनेक दुष्परिणांना सामोरे जावे लागू शकते. इंडिपेट्सच्या रिपोर्टनुसार शिळा भात आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते.  कच्च्या  तांदळात स्पोर्स असतात. जे शिजवतानाही शिल्लक असतात. जेव्हा भात बराचवेळ रूम टेम्परेचरवर ठेवला जातो तेव्हा स्पोर्स बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतो. म्हणून असा भात खाल्ल्याने बॅक्टेरिया शरीरात पोहोचल्याने तुम्हाला गंभीर विकार होऊ शकतात.

कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

बराचवेळ भात रुम टेम्परेचरवर असले तर असा भात कंटॅमिनेटेड होऊ शकतो. पोटाच्या विकाराव्यतिरिक्त कार्डिओवॅस्कल डिसिज होऊ शकतात. मॅनचेस्टर आणि सलफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार ज्या ठिकाणी भाताची शेती केली जाते. त्या मातीत आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते.

आर्सेनिक दुसऱ्या टॉक्सिन्सबरोबर  शरीरात गेल्याने कार्डिओवॅस्क्युलर आजार वाढण्याचा धोका असतो. म्हणून शिळा भात खाऊ नये. आपण शिळा भात गरम करून खाल्ला तर तब्येतीचं नुकसान होऊ शकतं हे बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यातून टॉक्सिन्स प्रोड्यूस होतात जे हिट रेसिस्टंट असतात. म्हणजेच  शिळे तांदूळ गरम केल्यानं त्यातील बॅक्टेरिया कमी करणं कठीण होतं. 

Web Title: Leftover Rice Eating Side Effects : Is it safe to eat leftover rice Leftover rice can cause food poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.