Lokmat Sakhi >Health > तासंतास पायावर पाय ठेवून बसताय? रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका, पुरुषांचा स्पर्म काऊंटही घटतोय..

तासंतास पायावर पाय ठेवून बसताय? रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका, पुरुषांचा स्पर्म काऊंटही घटतोय..

क्रॉस लेग म्हणजेच पायावर पाय ठेवून बसल्यानं तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.  कारण  या स्थितीत बसणं अनेकांना आरामदायक वाटतं. क्रॉस लेग ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:49 PM2023-04-04T17:49:23+5:302023-04-05T12:33:26+5:30

क्रॉस लेग म्हणजेच पायावर पाय ठेवून बसल्यानं तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.  कारण  या स्थितीत बसणं अनेकांना आरामदायक वाटतं. क्रॉस लेग ...

Leg crossing is it bad for your posture can be dangerous for health | तासंतास पायावर पाय ठेवून बसताय? रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका, पुरुषांचा स्पर्म काऊंटही घटतोय..

तासंतास पायावर पाय ठेवून बसताय? रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका, पुरुषांचा स्पर्म काऊंटही घटतोय..

क्रॉस लेग म्हणजेच पायावर पाय ठेवून बसल्यानं तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.  कारण  या स्थितीत बसणं अनेकांना आरामदायक वाटतं. क्रॉस लेग या पोझिशनमध्ये बसल्यावर गुडघ्यांच्या खालच्या भागावर दबाव पडतो. याच कारणामुळे वेदना जाणवतात. पायावर पाय ठेवून बसल्यानं ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या उद्भवते. कारण यामुळे संपूर्ण शरीरात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. यामुळे हृदयावर दबाव पडतो आणि ब्लड प्रेशर वाढतं. ( Leg crossing is it bad for your posture can be dangerous for health)

ज्या लोकांना आधीच बीपीची समस्या आहे. त्यांनी या स्थितीत बसणं टाळायला हवं. यामुळे पाय सुन्न होऊ शकतात तर कधी रक्त परिसंचयन व्यवस्थित होत नाही. काहीजणांना रक्तात गुठळ्या होण्याच त्रास उद्भवतो त्यामुळे क्रॉस  लेग सिटिंग पोझिशन ब्लड क्लोटिंग वाढवू शकते.

पायावर पाय ठेवून बराच वेळ बसण्याची सवय देखील तुम्हाला व्हेरिकोस व्हेन्सची समस्या देऊ शकते. काही लोकांमध्ये अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसांची समस्या असू शकते. परंतु इतर कोणतीही समस्या दिसत नाही. तर काही लोकांमध्ये तीव्र वेदना आणि चालण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या वाढतात.

नितंब आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होण्याचे कारण म्हणजे तुमची क्रॉस लेग्सनं बसण्याची सवय असू शकते. जे लोक बैठे काम करतात त्यांना पाठीच्या खालच्या बाजूला किंवा खांद्यामध्ये दुखण्याची समस्या असते. तुमच्‍या बसण्‍याच्‍या मुद्रेशी याचा खोल संबंध आहे. गर्भवती महिलांसाठी हे धोकादायक आहे.  जेव्हा गर्भवती महिलांचे पोट वाढू लागते, तेव्हा पोट संपूर्ण शरीराऐवजी गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बनते, कारण ते पुढे लटकलेले असते. म्हणूनच क्रॉस-पाय बसल्याने  गर्भावर दबाव येऊ शकतो.  याशिवाय, यामुळे पाय दुखणे किंवा तुमच्या घोट्यात सूज येऊ शकते. म्हणूनच तुम्ही नेहमी स्टूल किंवा खुर्चीवर दोन्ही पाय खाली ठेवून बसावे किंवा दोन्ही पाय पसरून सोफ्यावर बसावे.

बसण्याची कोणती स्थिती उत्तम आहे?

जेव्हा तुम्ही बसता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की बसताना, उभे असताना किंवा पडून राहताना तुमच्या संपूर्ण शरीराच्या उजव्या किंवा डाव्या दोन्ही बाजूंना गुरुत्वाकर्षण बल सारखेच असेल. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता तेव्हा दोन्ही पाय जमिनीवर ठेवा.

पाठ, कंबरेचा घेर कमीच होत नाही? घरीच फक्त ५ मिनिटात ४ योगासनं करा; मेंटेन दिसेल फिगर

असेही पुरावे आहेत की पाय क्रॉस ठेवल्यानं शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. याचे कारण असे की अंडकोषांचे तापमान प्रमाणित शरीराच्या तापमानापेक्षा 2°C आणि 6°C च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.  या स्थितीत बसल्याने अंडकोषांचे तापमान वाढते आणि स्पर्म्सचे तापमान 3.5°C पर्यंत वाढू शकते आणि अभ्यास सूचित करतात की अंडकोषाच्या तापमानात झालेली वाढ शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी करू शकते.

Web Title: Leg crossing is it bad for your posture can be dangerous for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.