Join us   

सांधेदुखी, केसगळती दोन्हीने हैराण आहात? आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात, १ रामबाण उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2023 9:56 AM

1 Ayurveda Remedy For Join pain and Hair Loss : औषधे घेण्यापेक्षआ घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय...

थंडीच्या दिवसांत किंवा एरवीही विविध कारणांनी आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो. एकदा ही सांधेदुखी सुरू झाली की आपल्याला काय करावं ते सुचत नाही. शरीराचे सर्व स्नायू एकावेळी ठणकतात. अशावेळी आपल्याला एकतर सतत आराम करावासा वाटतो किंवा कोणीतरी आपलं अंगं चेपून द्यावं असं वाटतं. इतकंच नाही तर सांधेदुखीबरोबरच केस गळतीचीही समस्या असेल तर या दोन्हीवर उपयुक्त असा एक सोपा उपाय डॉ मिहीर खत्री आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगतात. केस गळती ही पण सध्या एक महत्त्वाची समस्या झाली असून त्यासाठीही विविध कारणे असतात. मात्र त्यावर वेळीच उपाय केला तर ठिक नाहीतर हळूहळू आपल्या सौंदर्याबरोबरच मानसिकतेवरही त्याचा नकारात्मक परीणाम होऊ शकतो. पाहूयात सांधेदुखीसाठी डॉ. खत्री नेमका कोणता उपाय सांगतात (1 Ayurveda Remedy For Join pain and Hair Loss)...

उपाय काय? 

१ कप गरम दुधात २ चमचे देशी गाईचे तूप घालायचे. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध नियमित घ्यायचे. यामुळे सांधेदुखी आणि केसगळती कमी होण्यास मदत होते. मात्र तुम्हाला कफाचा त्रास असेल तर हा प्रयोग उपयुक्त ठरत नाही. घरच्या घरी आपण सहज हा उपाय करु शकतो. त्यामुळे औषधे घेण्यापेक्षा तुम्हाला या समस्या असतील तर आधी हा उपाय नक्की ट्राय करुन पाहा.

फायदे

१. दूधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स हे घटक असतात. तर तूपातून शरीराला वंगण मिळण्याचे काम होते. हे दोन्ही एकत्रित घेतल्याने आमवात किंवा हाडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

२. गुडघ्यांमध्ये कोरडेपणा आल्याने वय वाढले की आपल्याला गुडघेदुखीची समस्या सामान्यपणे उद्भवते. पण हा उपाय केल्यास गुडघेदुखी किंवा इतर सांधेदुखी कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

३. शरीरात कॅल्शियम, प्रोटीन्स यांसारख्या पोषक घटकांची कमतरता असल्याने केस गळण्यास सुरुवात होते. मात्र या उपायाने शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होते आणि कालांतराने ही समस्याही दूर होण्यास मदत होते. 

४. सांधेदुखीचा त्रास खूप दिवसांपासून आणि जास्त प्रमाणात असेल तर जानुबस्ती हा उपाय करायला हवा. जवळच्या आयुर्वेदीक दवाखान्यात जाऊन आपण हा उपाय करु शकतो, यामुळे नक्कीच आराम मिळण्यास मदत होते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपायब्यूटी टिप्स