Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटात गुडगुड होते, पोट फुगल्यासारखे वाटते? ओवा-हिंगाचा करा भन्नाट उपाय, पोटाला चटकन आराम

पोटात गुडगुड होते, पोट फुगल्यासारखे वाटते? ओवा-हिंगाचा करा भन्नाट उपाय, पोटाला चटकन आराम

1 easy and effective home remedies to treat stomach bloating पोटातील गॅसमुळे त्रस्त आहात? चिंता नको, ओव्याचा चहा देईल आराम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 12:52 PM2023-03-20T12:52:17+5:302023-03-20T12:53:16+5:30

1 easy and effective home remedies to treat stomach bloating पोटातील गॅसमुळे त्रस्त आहात? चिंता नको, ओव्याचा चहा देईल आराम..

1 easy and effective home remedies to treat stomach bloating | पोटात गुडगुड होते, पोट फुगल्यासारखे वाटते? ओवा-हिंगाचा करा भन्नाट उपाय, पोटाला चटकन आराम

पोटात गुडगुड होते, पोट फुगल्यासारखे वाटते? ओवा-हिंगाचा करा भन्नाट उपाय, पोटाला चटकन आराम

पोट नेहमी फुगलेले असते का? पोटातील गॅसमुळे त्रस्त आहात? थोडं खाल्ल्यानंतर पोट भरलेले वाटते का? वैद्यकीय भाषेत या समस्येला ब्लोटिंग असे म्हणतात. बर्‍याच लोकांना याचा त्रास होतो, विशेषत: जे लोकं बसून अधिक वेळ काम करतात, किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालीत गुंतलेले नसतात. त्यांना या समस्येला सामोरे जावे लागते.

ही समस्या सामान्य जरी वाटत असली तरी, सतत पोट फुग्ल्यामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) म्हणजेच पोट आणि आतड्यांसंबंधी आजार होण्याचा धोका वाढतो. ज्यात पोटात गॅस किंवा आम्लपित्त, अपचन, संसर्ग, पोटात किंवा आतड्यांमध्ये पाणी साचणे, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध इत्यादींचा समावेश होतो. यासंदर्भात, आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी ब्लोटिंगसाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत(Here's How You Can Use Ajwain And Hing To Ease Gassiness And Indigestion).

पोट फुगणे किंवा ब्लोटिंगचे लक्षण

पोटात गॅस तयार होणे

मळमळ

अतिसार

उलट्या

पोटदुखी

भूक न लागणे

ओटीपोटात जडपणा

ओवा व हिंगचा चहा 

यासाठी लागणारं साहित्य

अर्धा चमचा ओवा 

1/3 चमचे हिमालयीन गुलाबी मीठ

1/4 टीस्पून हिंग

कृती

या तिन्ही गोष्टी गरम पाण्यात उकळवत ठेवा. गाळणीतून चहा गाळून काढा, आता हा चहा पोटाची समस्या जाणवल्यास प्या. यामुळे पोट फुगणे, जडपणा, गॅस्ट्रिक, गॅसमुळे होणारी डोकेदुखी, फुगणे किंवा ओटीपोटात अस्वस्थता यापासून आराम मिळू शकेल.

ओवा व हिंगचा चहा किती दिवस प्यावा?

जर आपल्याला पचन संस्थेच्या निगडीत समस्या वारंवार भेडसावत असेल, तर आपण या चहाचे सेवन, जेवणाच्या अर्धा तास आधी/नंतर करू शकता. आपण एक आठवडा ते १५ दिवस नियमितपणे घेऊ शकता. यामुळे पोटाच्या अस्वस्थतेपासून आराम मिळेल.

पोटासाठी ओवा का फायदेशीर आहे?

ओवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. त्यामध्ये उपस्थित थायमोक्विनोनमधील सक्रिय घटक, अँटिऑक्सिडेंट आणि विरोधी दाहक गुणधर्म आहेत. जे शरीरातून नैसर्गिकरित्या विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करतात.

पचन संस्था उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे हिंग

हिंगामध्ये अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल संयुगे असतात. पोटदुखी, श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी हा पारंपारिक उपाय फायदेशीर ठरते. हिंगातील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे पचनक्रिया सुरळीत चालते. पोटातील विकार कमी होण्यास मदत होते. अॅसिडिटी, अपचनाचा त्रास कमी होतो. 

Web Title: 1 easy and effective home remedies to treat stomach bloating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.