Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हाडं ठणकतात-डोकं दुखतं, निराश वाटतं रात्री झोपण्याआधी करा १ काम, राहाल कायम फ्रेश-आनंदी

हाडं ठणकतात-डोकं दुखतं, निराश वाटतं रात्री झोपण्याआधी करा १ काम, राहाल कायम फ्रेश-आनंदी

1 Easy Solution for Various Health Problems : आपली काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 11:10 AM2023-07-10T11:10:08+5:302023-07-10T11:12:15+5:30

1 Easy Solution for Various Health Problems : आपली काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार...

1 Easy Solution for Various Health Problems : Bones harden-headache, feel depressed Do 1 thing before going to bed at night, you will stay fresh-happy forever | हाडं ठणकतात-डोकं दुखतं, निराश वाटतं रात्री झोपण्याआधी करा १ काम, राहाल कायम फ्रेश-आनंदी

हाडं ठणकतात-डोकं दुखतं, निराश वाटतं रात्री झोपण्याआधी करा १ काम, राहाल कायम फ्रेश-आनंदी

दिवसभर आपण घरकाम, ऑफीस, बाहेरची कामं, डोक्यात असंख्य विचार हे सगळे करताना फार थकून जातो. सकाळी घड्याळ्याच्या काट्यासोबत सुरू होणारा आपला दिवस रात्रीही फार उशीरा संपतो. रात्री झोपतानाही आपल्या डोक्यात दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय करायचं आणि मुलांना डब्यात काय द्यायचं हेच विचार असतात. हे सगळं करता करता मन, मेंदू, शरीर तर थकतंच पण आपल्या मागे काही ना काही समस्याही लागतात. घरातील प्रत्येकाची काळजी आपण घेत असलो तरी आपल्याकडे पाहायला मात्र कोणाला वेळ नसतो. त्यामुळे आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागते (1 Easy Solution for Various Health Problems). 

अनेकदा दिवसभराच्या बैठ्या कामाने अंगदुखी, पाठदुखी सुरु झालेली असते. कधी डोकं ठणकत असतं तर कधी मन अस्वस्थ असतं. झोप न लागणे, मायग्रेन, नैराश्य आणि मेनोपॉज, हाडांची ठिसूळता यांसारख्या काही ना काही समस्या तर कमी अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्रीला भेडसावतात. आपण त्यावर तात्पुरते काहीतरी उपाय करतो आणि रोजचा गाडा रेटत राहतो. मात्र कधी कधी हे त्रास इतके जास्त होतात की मग आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय आणि गोळ्या औषधे घेण्याशिवाय पर्यायच राहत नाही. मात्र जीवनशैलीशी निगडीत असणाऱ्या लहानमोठ्या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे धाव घेण्यापेक्षा काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. 

आरोग्याच्या दैनंदिन समस्यांवर १ सोपा उपाय  

(Image : Google)
(Image : Google)

रोज रात्री झोपताना बेडवर पडल्यानंतर विपरीत करणी हे आसन न चुकता करावे. बेडच्या आजुबाजूला भिंत असेल तर त्याला टेकून किंवा खाली जमिनीवर झोपूनही हे आसन करता येते. कंबरेपासून पायाचा पूर्ण भाग भिंतीला चिकटलेला हवा आणि पाठ जमिनीला किंवा गादीला चिकटलेली हवी. किमान १० ते १५ मिनीटे या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करावा. २ ते ३ मिनीटांपासून सुरुवात करुन हळूहळू वेळ वाढवत न्यावी. यामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात आणि रिलॅक्स वाटण्यास मदत होते. 

फायदे

१. उदासीनता आणि निद्रानाशाची लक्षणे दूर होण्यास याचा चांगला फायदा होतो. विपरिता करणी हे एक असे आसन आहे, जे मनाला प्रसन्न आणि  शांत करण्यास मदत करते. या आसनामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

२. भावनिक लोकांना अनेकदा जास्त प्रमाणात विचार केल्याने झोप येत नाही. झोप पूर्ण झाली नाही की त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे ज्यांना असा त्रास होतो त्यांनी विपरीत करणी हे आसन आवर्जून करावे. 

३. हे आसन नियमित केल्यास श्वसनाच्या समस्या दूर होतात. या आसनामुळे डोळे आणि कानांच्या समस्यासुद्धा दूर होतात. एवढेच नाही तर, या रक्तप्रवाहही नियंत्रित राहावा यासाठीही या आसनाचा फायदा होतो.

४. हे आसन रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. पोट आणि सर्व अवयवांना ताजे रक्त आणि लिम्फ द्रव पुरवण्यास या आसनाचा फायदा होतो.

५. मान आणि खांद्याच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे आसन महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या दूर करते. हे आसन रजोनिवृत्ती आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करते. 

Web Title: 1 Easy Solution for Various Health Problems : Bones harden-headache, feel depressed Do 1 thing before going to bed at night, you will stay fresh-happy forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.