Join us   

पडल्या - पडल्या २ मिनिटात लागेल झोप, फॉलो करा सोपी लिएइसी टेक्नीक, शांत - गाढ झोपेसाठी बेस्ट पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 6:30 PM

1 Simple Tip That Help You Fall Asleep Quickly अमेरिकन आर्मी देखील फॉलो करतात लिएइसी टेक्नीक, २ मिनिटात लागते शांत झोप..

आरोग्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. तज्ज्ञ ८ तास झोप घेण्याचा सल्ला देतात. पण काही लोकांची झोप पूर्ण होत नाही. काहींना लवकर झोपण्याची सवय नसते. तर, काही लोकांना पडल्या - पडल्या झोप लागत नाही. अशा तक्रारी आपण अनेकांकडून ऐकल्या असतील. जर आपल्या शरीराला लवकर झोपण्याची सवय लावायची असेल तर, लिएइसी टेक्नीकचा वापर करून पाहा. लवकर झोप येण्यासाठी या टेक्नीकचा वापर अमेरिकन आर्मी देखील करतात.

याचा सतत सराव केल्याने फक्त दोन मिनिटांत आपल्याला झोप लागू शकते. लॉयड बड विंटर यांच्या 'रिलॅक्स अँड विन: चॅम्पियनशिप परफॉर्मन्स' या पुस्तकात या टेक्नीकचे प्रथम वर्णन करण्यात आले आहे. हे पुस्तक 1981 मध्ये प्रकाशित झाले. ज्यानंतर फिटनेस कोच जस्टिन अगस्टिन यांनी याच्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी या टेक्नीकचा वापर कसा करावा हे सांगितले(1 Simple Tip That Help You Fall Asleep Quickly).

या स्लिपिंग टेक्नीकबद्दल जाणून घ्या

सर्वप्रथम, आपले शरीर शांत करा, सगळे विचार डोक्यातून काढा. यानंतर, शरीरातील प्रत्येक अवयवाला आराम द्या. आपल्या कपाळाच्या स्नायूंना आराम द्या, जेणेकरून डोक्यात इतर विचार येणार नाहीत. आपल्या संपूर्ण चेहऱ्याला आराम देऊन श्वासावर लक्ष केंद्रित करा. खांद्याला देखील आराम द्या, संपूर्ण शरीर सैल सोडा.

धाप लागते, श्वास कोंडतो - ५ गोष्टी करा तातडीने - सोपे लाईफस्टाईल बदल - श्वास घ्या मोकळा

दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा. यासोबतच छाती, पोट आणि पाय आरामात ठेवा. पण हे करत असताना, मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्या. अशा वेळी स्वतःला स्वच्छ पाण्याच्या शांत सरोवर किंवा अंधाऱ्या खोलीत मखमली झुल्यावर पडलेले आपण पाहू शकता. आपण या ठिकाणी आहोत याची कल्पना करा.

वाढलेले वजन - मासिक पाळी अनियमित? तज्ज्ञ सांगतात, हर्मोनाल घोळाची ४ कारणे

दोन मिनिटांत लागेल झोप

अगस्टिन सांगतात, ''जर आपण या टेक्निकचा सराव 6 आठवडे रोज केलात तर, तुम्हाला दोन मिनिटांत झोप येईल. मात्र, यावर कोणतेही संशोधन झालेले नाही, ते खरेच काम करते की नाही? पण या मेडिटेशनमुळे लवकर झोप येते.''

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य