निरोगी जीवन जगण्यासाठी उत्तम जीवनशैली असणे गरजेचं आहे. निरोगी आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि लवकर उठणे हे काही बदल निरोगी व तणावमुक्त जगण्यास मदत करतात. यासह काही फळांचा आहारात समावेश केल्याने आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. ज्यात खजुराचा देखील समावेश आहे. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत.
काही लोकं सकाळी नियमित खजूर खातात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि कॅल्शिअम हे मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. नियमित खजूर खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात, यासंदर्भात, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे(10 Amazing Health Benefits of Dates That You Should Know!).
तज्ज्ञांच्या मते, 'बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की, खजूर खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पण ते खरं नाही. उलट ताकदीसाठी खजूर खाणं उत्तम.
खजूर खाण्याचे फायदे
खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
हृदयाचे आरोग्य सुधारते.
गुड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
हाडांचे आरोग्य सुधारते.
सतत होणारे मूड स्विंग्ज टाळा, खा ५ गोष्टी- सतत मूड जा-ये करणार नाही- वाटेल एनर्जेटिक
रक्तदाब नियंत्रित ठेवते.
स्त्री आणि पुरुष दोघांच्याही लैंगिक आरोग्यासाठी उत्तम.
थकवा (अशक्तपणा) दूर करते.
वेट गेनसाठी उत्तम आहार.
मूळव्याधीवर रामबाण उपाय.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर.
खजूर खाण्याची उत्तम वेळ
खजूर नियमित सकाळी रिकाम्या पोटी खा. किंवा दुपारच्या जेवणासोबत खा. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास आपण खजूर खाऊ शकता. जर आपल्याला वेट गेन करायचं असेल तर, रात्री तुपात खजूर भिजवून खा.
बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी, नियमित खा ४ पदार्थ, गंभीर आजार राहतील लांब
खजूर किती खावे?
सुरुवातीला फक्त २ खजूर खा. त्यानंतर रोज रात्री तुपात भिजवलेले किंवा तसेच ४ खजूर खा.
वजन वाढवायचे असेल तर रोज ४ खजूर खाव्यात.
बाळांसाठी खजूर
बाळाचे आरोग्य व रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपण त्यांना खजूर खायला देऊ शकता. कमी वजन, कमी हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांनी दररोज खजूर खावे. निदान ३ महिने तरी नियमित खजूर खावे.