बदाम आरोग्यासाठी मानले जाते. त्यामुळे तज्ज्ञ दररोज बदाम खाण्याचा सल्ला देतात (Soaked Almonds). बदामातील पौष्टीक घटक मेंदूला चालना देण्यास आणि आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत करतात (Health Tips). शिवाय चेहऱ्यावर देखील चमक येते, आणि केसही सुंदर होतात (Brain sharp). पण भिजवलेले की भाजलेले बदाम खाल्ल्याने फायदा होतो? हे अनेकांना ठाऊक नसते.
बदमामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फॉस्फरस, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुपरफूड मानले जाते. बदामातील पौष्टीक घटक शरीराला मिळावे, यासाठी बदाम कशापद्धतीने खावा, याची माहिती फोर्टिस हॉस्पिटलच्या डायटीशियन सिमरन सैनी यांनी दिली आहे(10 benefits of having soaked almonds).
बदाम कसे भिजवायचे?
- एका भांड्यात १० बदाम घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या.
- नंतर त्यात पाणी घाला, रात्रभर झाकून ठेवा.
- सकाळी भिजलेले बदाम सोलून खा.
१० भिजवलेल्या बदामामध्ये किती पोषक तत्व असतात?
फॅट्स - ५ ग्रॅम
कार्बोहायड्रेट - ३ ग्रॅम
प्रोटीन - ३ ग्रॅम
कॅलरीज - ७०
भिजवलेले बदाम खाण्याचे जबरदस्त फायदे
पचनक्रिया सुरळीत
भिजलेले बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात लिपेस एन्झाइम असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
वेट लॉससाठी मदत
भिजवलेले बदामामध्ये लिपेससह अनेक एन्झाइम असतात. जे चयापचय बुस्ट करतात. याशिवाय बदामामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते
बिघडलेली जीवनशैली आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे सायलेंट हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ होते. याला कारणीभूत बॅड कोलेस्टेरॉल ठरते. जर आपल्याला बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर, दररोज सकाळी भिजवलेले १० बदाम खा. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होईल.
पोषक तत्वांनी परिपूर्ण
बदाम भिजवल्यावर ते पाचक एन्झाईम्स तोडतात. पोषक तत्वांव्यतिरिक्त, हे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सशी संबंधित फायदे वाढवते. शिवाय टॅनिन आणि फायटिक ॲसिड सारख्या गोष्टी काढून टाकते. हे अँटीन्यूट्रिएंट्स खनिजांचे शोषण कमी करतात.
मेंदूसाठी उत्तम
बदामाला ब्रेन फूड असेही म्हणतात. त्यात व्हिटॅमिन-ई प्रमाण जास्त असते. भिजवलेले बदाम मेंदूचे आरोग्य दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात फेनिलॅलानिन असते, जे स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय ओमेगा-६ आणि ओमेगा-३मुळे भिजवलेले बदाम मेंदूच्या उत्तम कार्यासाठी मदत करते.
रक्तातील साखरेच्या पातळीत सुधारणा
भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियमची पातळी सुरळीत होते. जे रक्तदाब नियंत्रित करते. शिवाय टाईप २ महुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
उर्जा वाढते
भिजवलेल्या बदामामध्ये असणारे रिबोफ्लेविन आणि पोटॅशियम शरीरातील चयापचय बुस्ट करते. ज्यामुळे शरीरातील उर्जा पातळी वाढते. जर आपल्याला एनर्जेटिक राहायचं असेल तर, सकाळी भिजलेले बदाम खा.
अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?
त्वचेवर येतो ग्लो
भिजलेले बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. त्यात व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्स आणि वृद्धत्वाच्या लक्षणांपासून संरक्षण करतात. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट मानले जाते. याव्यतिरिक्त, त्यात अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेला पेशींच्या नुकसानीपासून वाचवतात.
केसांचे आरोग्य सुधारते
भिजलेले बदाम केसांनाही निरोगी ठेवतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 12, ओमेगा 3 आणि 6 फॅटी ऍसिड आणि मॅग्नेशियम असतात. जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे केस गळणे कमी होते.
साबणावरुन पाय घसरला आणि ‘ती’ थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, बघा नेमकं झालं काय?
डोळ्यांसाठी उत्तम
भिजलेले बदाम डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ई असते जे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करते. तसेच बदामामध्ये झिंक असते जे रेटिनाला निरोगी ठेवते.