Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाढदिवसाचा केक खाल्ला आणि चिमुकलीचा झाला मृत्यू, केकमध्ये सापडला ‘हा’ घटक, जीवाला धोका कारण..

वाढदिवसाचा केक खाल्ला आणि चिमुकलीचा झाला मृत्यू, केकमध्ये सापडला ‘हा’ घटक, जीवाला धोका कारण..

10-year-old girl dies after eating her birthday cake : केक गोड लागत असला तरी कधीकधी त्यानं तब्येतीलाही धोका होऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2024 12:09 AM2024-04-27T00:09:58+5:302024-04-27T00:10:47+5:30

10-year-old girl dies after eating her birthday cake : केक गोड लागत असला तरी कधीकधी त्यानं तब्येतीलाही धोका होऊ शकतो

10-year-old girl dies after eating her birthday cake | वाढदिवसाचा केक खाल्ला आणि चिमुकलीचा झाला मृत्यू, केकमध्ये सापडला ‘हा’ घटक, जीवाला धोका कारण..

वाढदिवसाचा केक खाल्ला आणि चिमुकलीचा झाला मृत्यू, केकमध्ये सापडला ‘हा’ घटक, जीवाला धोका कारण..

वाढदिवस म्हणजे वाढत्या वयाची जाणीव करवून देणारा दिवस (Social Viral). हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो. नव्या उमेदीने या दिवसाचा स्वीकार करतो. हा खास दिवस बरेच जण केक कापून साजरा करतात. पण याच दिवशी मृत्यू झाला तर..? ते ही केक खाऊन. साहजिक हा दिवस आपल्या घरच्यांसाठी काळा दिवस ठरू शकतो, आणि हाच काळा दिवस एका चिमुकलीच्या वाटेला आला आहे. पटियालास्थित १० वर्षीय मानवीचा, २४ मार्च रोजी वाढदिवस होता. पण याच दिवशी तिचा केक खाऊन मृत्यू झाला. नक्की मृत्यू कशामुळे झाला? केकमधली कोणती गोष्ट खाऊन ती आजारी पडली? पाहूयात(10-year-old girl dies after eating her birthday cake).

नक्की प्रकरण काय?

पटियालाच्या अमन नगर परिसरात १० वर्षाची चिमुकली, मानवी तिच्या परिवारासोबत राहायची. २४ मार्च रोजी तिचा वाढदिवस होता. या दिवशी आई काजलने झोमॅटोवरुन कान्हा फर्ममधून केक मागवला होता. रात्री सगळ्यांनी वाढदिवस साजरा केला. केक देखील खाल्ला. परंतु, केक खाल्ल्यानंतर मानवीची तब्येत बिघडली. घरातल्या इतर सदस्यांनाही उलट्या झाल्या. मात्र, मानवीची तब्येत अधिक खालावली. तिला दवाखान्यात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

केकमध्ये आढळली एक घातक गोष्ट

केकचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात सॅकरिनचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून आले. एनडीटीव्हीला माहिती देताना, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ विजय जिंदाल सांगतात, 'केक तयार करताना त्यात जास्त प्रमाणात सॅकरिन मिसळले गेले असावे. याचा वापर बऱ्याच गोड पदार्थांमध्ये होतो.'

डायबिटीस असेल तर आंबा खावा का? ब्लड शुगर वाढेल म्हणून खाणं टाळत असाल तर, तज्ज्ञ काय सांगतात पाहा..

सॅकरिन म्हणजे काय? याचा वापर पदार्थांमध्ये का केला जातो?

सॅकरिन हे एक कृत्रिम स्वीटनर आहे. ज्याचा वापर १०० वर्षांपासून पेय आणि पदार्थ गोड करण्यासाठी केला जात आहे. हे साखरेपेक्षा ३०० ते ४०० पट गोड आहे, परंतु याने कॅलरीज वाढत नाही. त्यामुळे याचा वापर साखरेच्या जागीही केला जाऊ शकतो.

अधिक प्रमाणात खाणे टाळा

सॅकरिन फायदे आहेत, पण अधिक प्रमाणात खाणे टाळावे. एफडीएने देखील याचा वापर पदार्थांमध्ये जास्त न करण्याचा दिला आहे. कोणतीही व्यक्ती त्याच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम, म्हणजेच ५ मिलीग्राम सॅकरिन घेऊ शकते. उदारणार्थ, जर आपले वजन ७० किलो असेल तर, आपण एका दिवसात ३५० मिलीग्राम सॅकरिन पदार्थात मिक्स करू शकतो.

विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

सॅकरिनपासून कर्करोगाचा धोका

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, कृत्रिम गोड पदार्थ शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. काही संशोधनांमध्ये सॅकरिनच्या अधिक वापरामुळे, मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे. शिवाय लठ्ठपणा आणि मधुमेहाचाही धोका वाढतो. आपले यकृत आणि मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते.

इतर कृत्रिम स्वीटनर्सची नावे

सॅकरिन व्यतिरिक्त, एस्पार्टम आणि सायक्लेमेट हे देखील कृत्रिम गोड करणारे स्वीटनर्स आहेत. याच्या अधिक सेवनामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. 

Web Title: 10-year-old girl dies after eating her birthday cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.