Join us   

'मी कधीच हॉटेलमध्ये जेवले नाही,' १०० वर्ष जगणाऱ्या आजी सांगतात डाएट-निरोगी आयुष्याचं सोपी सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:57 PM

100 year Old Shares What They Always Eat In Diet : लोक किती वर्ष  जगतात हे पूर्णपणे त्यांच्या आहारावर अवलंबून असते.

खाणंपिणं आपल्या आपले आरोग्य आणि आयुष्यावर अनेकदृष्ट्या प्रभाव पाडते. अनेक संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की, ज्यांचे वय  ९९ किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांचा आहार फार महत्वपूर्ण असतो. योग्य आहारात लांब आणि निरोगी जीवनासाठी महत्वपूर्ण ठरते.  लोक किती वर्ष जगतात हे पूर्णपणे त्यांच्या आहारावर अवलंबून असते. (100 year Old Shares What They Always Eat In Diet And What They Avoid)

एलिजाबेथ फ्रांसिस या अमेरीकेतील सर्वात वयस्कर महिला आहे त्या आता ११५ वर्षांच्या आहेत. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये एबीसी १३ ला सांगितले होते की त्या सगळेकाही खातात. त्यांची नात एथेल हॅरीसन सांगते की फ्रांसिस नेहमीच आपल्या घराच्या  बागेत भाज्या उगवतात आणि त्या खातात.  कधीच फास्ट फूड खात नाहीत.  याव्यतिरिक्त त्यांनी कधीच धुम्रपान केले नाही ना कधी दारू प्यायली. या सवयी त्यांना दीर्घायुष्यापर्यंत घेऊन गेल्या. 

१०२ वर्षांच्या वयातही देबोरा सेजेकी आपल्या फिटनेस रिजॉर्ट आणि स्पा  आठवड्यातून ३ ते ४ वेळा चालवतात. त्यांनी कधीच मांसाहार केला नाही आणि नेहमी प्लांट बेस्ड डाएट घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या पेस्केटेरियन आहेत म्हणजेच मासे आणि भाज्यांचे सेवन करतात पण मांस खात नाहीत. 

सकाळच्या नाश्त्याला दही, केळी किंवा अन्न धान्यांचा पौष्टीक नाश्ता, दुपारच्या जेवणाला सॅलेड किंवा रेस्टॉरंटमध्ये हलकं भोजन रात्रीच्या जेवणाला मासे, सॅलेड आणि भाजलेल्या बटाट्यांचा समावेश होता. त्यांचे डाएट मेडिटेरियन डाएटप्रमाणे आहे. ज्यात फळं, भाज्यांचा समावेश आहे.

शर्ली डोह्स यांनी मागच्यावर्षी मार्चमध्ये CNBC Make It शी संवाद साधला. तेव्हा त्यांचे वय  १०६ होते. त्यांनी सांगितले की त्यांच्या जेवणात एनिमल फॅट कमीत कमी घेतात आणि फक्त स्किम मिल्क घेतात. त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान रेड क्रॉस कडून न्युट्रिशनचा कोर्स केला होता. त्याचवेळी संतुलित आणि साधा आहार घेतला. त्यांच्या डाएटमध्ये गोड पदार्थ खूप कमी असायचे.

फोर्ब्सशी बोलताना ९९ वर्षांच्या मॅकफॅडन यांनी आपले डाएट शेअर केले त्यांनी सांगितले की त्यांचे रोजचे जेवण असे काही होते नाश्त्याला ओटमील, क्रॅनबेरी, ज्यूस आणि केळी, सॅलेडमध्ये बीट, टोमॅटो, चिकन यांचा समावेश होता. रात्रीच्या जेवणात कमी फॅट्सयुक्त मांस आणि वाफेवर शिजलेल्या भाज्यांचा समावेश होता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल