Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

12 Surprising Benefits of Drumstick That Can Change Your Health शेवगा आहारात नियमित हवाच, शेवग्याची शेंग म्हणजे भरपूर पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2023 05:52 PM2023-08-20T17:52:10+5:302023-08-21T15:32:10+5:30

12 Surprising Benefits of Drumstick That Can Change Your Health शेवगा आहारात नियमित हवाच, शेवग्याची शेंग म्हणजे भरपूर पोषण

12 Surprising Benefits of Drumstick That Can Change Your Health | शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करावा. अनेक फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगली असतात. ज्यात शेवग्याच्या शेंग्यांचा देखील समावेश आहे. अनेजण शेवग्याच्या शेंग्यांची भाजी खातात. सांबारमध्ये देखील शेवग्याच्या शेंग्यांचा वापर होतो. पण याचे फायदे फार कमी लोकांना माहित आहे.

शेवग्याच्या शेग्यांमध्ये अनेक पौष्टीक घटकांचा समावेश आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टीक घटक आढळतात. फक्त शेंगाच नाही तर, त्याच्या पानात देखील अनेक पौष्टीक घटक आढळतात. शेवग्याच्या शेंग्यांचा आहारात समावेश का करावा? याची माहिती आयुर्वेदतज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी दिली आहे(12 Surprising Benefits of Drumstick That Can Change Your Health).

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा का खाव्या

शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा २५ पट जास्त लोह आढळते. दुधापेक्षा १७ पट जास्त कॅल्शियम असते. यासह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन्सचे भांडार आढळते. यात अँटीबायोटिक, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-एजिंग आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. याचा वापर ३०० रोगांवर उपचार करण्यासाठी होतो.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

केस गळती कमी होते.

हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.

ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते.

यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते.

३ महिने रोज ३ ग्रॅम जिरे खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजनही घटेल आणि...

वजन कमी करण्यास मदत होते.

चयापचय सुधारते.

साखरेची पातळी नियंत्रित करते.

तणाव, चिंता आणि मूड स्विंग कमी करते.

आईचे दूध वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

दमा आणि खोकला बरा होतो.

संधिवात रुग्णांसाठी फायदेशीर.

शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर करते.

सतत भूक लागते? काहीतरी खाण्याची इच्छा सतावते? असे का होते, यावर उपाय काय?

शेवग्याच्या शेंगा कसे खावे?

शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. ड्रमस्टिक सूप संधिवात वेदना कमी करण्यास मदत करते. पण त्यापेक्षा त्याच्या पानात अनेक गुणधर्म आढळतात. आपण शेवग्याच्या शेंग्याच्या पानांची पावडर तयार करू शकता. या पावडरचा उपयोग आपण चपाती, चिला, स्मुदी, डाळ किंवा वॉटर एनर्जी ड्रिंक्समध्ये मिक्स करून करू शकता.

Web Title: 12 Surprising Benefits of Drumstick That Can Change Your Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.