Join us   

पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यावर पाहा असरदार इलाज, २ खास रेसिपी-प्रत्येक घरासाठी हमखास उपयाेगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 2:27 PM

Best Home Remedies For Cold, Cough And Sore Throat: पावसाळ्यात सर्दी- खोकल्याचा त्रास होतोच. त्यामुळेच या रेसिपी पाहून ठेवा. प्रत्येक घरात कधी ना कधी उपयोगी येतीलच अशा खास रेसिपी... (monsoon and diseases)

ठळक मुद्दे हा काढा प्यायल्याने घसा दुखणे, सर्दीचा त्रास कमी होईल. नाक चोंदलं असेल तर कफ कमी होऊन ते ही मोकळं होईल. तसेच स्ट्रेस व एन्झायटी कमी करण्यासाठीही हा उपाय उत्तम आहे.

सध्या पावसाने सगळीकडेच जोर धरला आहे. सतत येणारा पाऊस, ढगाळ वातावरण, हवेतला गारवा यामुळे सर्दी- खोकला असा त्रास होतोच. तसाच तो आता बऱ्याच घरांमध्ये दिसू लागला आहे. विशेषत: लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती यांना तर सगळ्यात आधी हवेतला गारवा बाधतो. सर्दी, खोकला असे त्रास पावसाळ्यात वारंवार होणारच (monsoon and diseases). पण म्हणून मग लगेच औषधं- गोळ्या घेणं योग्य नाही. त्यामुळेच आता या काही खास रेसिपी पाहा... (2 best home remedies for cold, cough and sore throat in rainy days) घरगुती पदार्थ वापरून सर्दी- खोकला कमी करणारं औषध किंवा काढा कसा तयार करायचा हे यात सांगितलं आहे. (best home made ayurvedic medicine for cold and cough)

सर्दी- खोकल्याचा त्रास लगेचच कमी करणारा खास उपाय

 

सर्दी खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीची माहिती hebbars.archana या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

१. ओव्याचा काढा

वारंवार सर्दी होत असेल तर ओव्याच्या पानांचा एक उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी ओव्याची ४ ते ५ पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ही पाने गॅसवर भाजून घ्या.

अनंत- राधिकाच्या लग्नात नीता अंबानींच्या हातात दिसलेल्या रमन दिव्याचं काय महत्त्व, कसा असतो तो?

आता एका पातेल्यात १ कप पाणी गरम करायला ठेवा. त्यात ओव्याची भाजून घेतलेली पाने टाका. त्यामध्येच दालचिनीचा एक छोटासा तुकडा. ८ ते ९ मिरे आणि ५ ते ७ लवंगा टाका. हे मिश्रण चांगलं उकळून घ्या आणि त्यानंतर गाळून घ्या. हा काढा प्यायल्याने घसा दुखणे, सर्दीचा त्रास कमी होईल. नाक चोंदलं असेल तर कफ कमी होऊन ते ही मोकळं होईल. तसेच स्ट्रेस व एन्झायटी कमी करण्यासाठीही हा उपाय उत्तम आहे.

 

२. आल्याचा काढा

हा काढा तयार करण्यासाठी आल्याची सालं काढून घ्या. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून ते खलबत्त्यात कुटून घ्या. यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा.

लग्नसोहळ्यासाठी नीता अंबानींपासून राधिकापर्यंत सगळ्यांचेच लेहेंगे डिझाईन करणारी 'ही' व्यक्ती पाहिली का?

त्यामध्ये बारीक केलेलं आलं, ४ ते ५ लवंगा, चिमूटभर हळद, २ वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा ५ ते ६ मिरे असं सगळं साहित्य टाका आणि हे मिश्रण चांगलं उकळून घ्या. त्यानंतर गाळून हा काढा गरमागरम प्या. यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास लगेचच कमी होईल. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपावसाळा आणि पावसाळी आजारपणहोम रेमेडी