Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोकं दुखायला लागलं की लगेच गोळी घेता? २ घरगुती उपाय, काही मिनिटांत डोकेदुखी कमी

डोकं दुखायला लागलं की लगेच गोळी घेता? २ घरगुती उपाय, काही मिनिटांत डोकेदुखी कमी

Best Home Remedies For Headache: दरवेळी डोकं दुखायला लागल्यावर गोळी घेत असाल तर त्याऐवजी हे काही घरगुती उपाय करून पाहा.. (how to stop headache without taking pain killer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 03:05 PM2024-08-24T15:05:29+5:302024-08-24T16:08:13+5:30

Best Home Remedies For Headache: दरवेळी डोकं दुखायला लागल्यावर गोळी घेत असाल तर त्याऐवजी हे काही घरगुती उपाय करून पाहा.. (how to stop headache without taking pain killer)

2 home remedies to get rid of headache naturally, how to stop headache without taking pain killer | डोकं दुखायला लागलं की लगेच गोळी घेता? २ घरगुती उपाय, काही मिनिटांत डोकेदुखी कमी

डोकं दुखायला लागलं की लगेच गोळी घेता? २ घरगुती उपाय, काही मिनिटांत डोकेदुखी कमी

Highlightsडोकं दुखायला लागलं असेल तर अवघ्या काही मिनिटांतच तो त्रास कसा कमी करायचा, याविषयी एक खास उपाय

डोकं दुखण्याचा त्रास बहुतांश लोकांना सतत छळतो. महिन्यातून एकदा तरी डोकं दुखायला लागलं ही त्यांची तक्रार असतेच. डोकं का दुखतं याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत. तज्ज्ञ सांगतात की डोकं दुखणं हा काही वरवरचा त्रास नाही. तुमचं शरीर डोकेदुखीच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. डोकेदुखी सतत होत असेल तर त्यासोबत इतर कोणते त्रासही तुम्हाला जाणवतात का हे एकदा बारकाईने बघा आणि त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या (2 home remedies to get rid of headache naturally). पण डोकं दुखायला लागलं की लगेच खा गोळी असं करणं मात्र कटाक्षाने टाळायला हवं. (how to stop headache without taking pain killer?)

 

याचविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ chikitsaguru या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात की वैद्यक शास्त्रानुसार आपल्या शरीराचे १७ वेगवेगळे भाग आहेत.

छोट्याशा कुंडीतही येतील भरपूर लवंगा, बघा कमीतकमी जागेत कसं वाढवायचं लवंगाचं रोप 

त्यापैकी एक भाग म्हणजे डोकं. जेव्हा डोकेदुखी होते म्हणून आपण गोळी घेतो, तेव्हा शरीराच्या इतर भागांनाही विनाकारण त्या गोळीचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळेच वारंवार डोकेदुखीची गोळी घेणं चुकीचं आहे असं ते सांगतात.


 

डोकेदुखीवर घरगुती उपाय

डोकं दुखायला लागलं असेल तर अवघ्या काही मिनिटांतच तो त्रास कसा कमी करायचा, याविषयी त्यांनी एक खास उपाय सांगितला आहे. तो उपाय करण्यासाठी जमिनीवर, सतरंजीवर पाठीवर झोपा. डाेक्याखाली उशी घेऊ नका. सगळे शरीर एका समान पातळीवर असू द्या. यानंतर उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने २ ते ३ मिनिटे श्वासोच्छवास करा. त्यानंतर १- २ मिनिटे तसेच डोळे मिटून शांत पडा. डोकेदुखी बऱ्यापैकी कमी झाली असल्याचे जाणवेल.

पाठ- कंबर- गुडघे दुखतात? रोजच्या जेवणात 'ही' चटणी खा, भरपूर कॅल्शियम मिळेल- दुखणं पळेल

डोकेदुखी कमी करण्यासाठी हा आणखी एक उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एक चिमूटभर मीठ घ्या आणि ते तुमच्या जिभेवर ठेवा. त्यानंतर ३० सेकंंदांनी १ ग्लास पाणी प्या. लवकर आराम वाटेल. mahila_swasthya_foundation या इन्स्टाग्राम पेजवर हा उपाय सांगितला आहे. 

 

Web Title: 2 home remedies to get rid of headache naturally, how to stop headache without taking pain killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.