तोंडाच्या स्वच्छतेसाठी आपले दात स्वच्छ असणं गरजेचं आहे (Brushing Teeth). सकाळी उठल्यानंतर आपण आधी दात घासतो. मग पुढची कामं करतो. चमकदार आणि निरोगी दात हवे असतील तर, फक्त दात स्वच्छ असणं गरजेचं नाही (Cleaning Teeth). संपूर्ण ओरल हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. आजकाल बरेच जण दातांच्या समस्येने त्रस्त आहेत.
ब्रश करताना आपल्याकडून अनेक चुका होतात (Oral health). ज्यामुळे नंतर दातदुखी, हिरड्या सुजणे, पोकळी आणि दात कमकुवत होण्याचे प्रकार होतात. जर दात कमी वयात खराब होऊ नये, शिवाय पडू नये असे वाटत असेल तर, लंडनच्या डेण्टिस्ट डॉ. शादी मनोचहरी यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे दातांच्या अनेक समस्या सुटतील(2 Mistakes To Avoid While Brushing Teeth).
कॉफी प्यायल्यानंतर ब्रश करू नका
अनेकांना काही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर दात घासण्याची सवय असते. ही सवय वेळीच मोडा. काही जण कॉफी प्यायल्यानंतर दात घासतात, जे अत्यंत चुकीचे आहे. कारण कॉफी हे आम्लयुक्त असते. यानंतर जर आपण दात घासत असाल तर, याचा अर्थ आपण दातांवर ॲसिड घासत आहात. यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते.
दात कमकुवत होऊ शकतात
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दात इनॅमल, डेंटीन आणि रूट सिमेंट यांसारख्या खनिजांपासून बनलेले असतात. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा ते बॅक्टेरियांनी झाकलेले असतात. जे सकाळी दात घासून काढणे गरजेचं आहे. अन्यथा अॅसिडमुळे दात कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे नाश्ता आणि कॉफी प्यायल्यानंतर ब्रश करणे टाळावे, त्याआधी ब्रश करावे.
खाण्या-पिण्यानंतर नेमके कधी दात घासावेत
दातांची समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांनी खाण्या पिण्याच्या ३० ते ६० मिनिटांनी दात घासण्याचा सल्ला दिला आहे. जर आपल्याला या वेळेदरम्यान दात घासण्याची गरज वाटत असेल तर, माउथवॉशने स्वच्छ करा. यामुळे दात क्लिन होतील.
ब्रश कधी करू नये?
डेण्टिस्टने उलटी झाल्यानंतर लगेच ब्रश करू नये असा सल्ला दिला आहे. कारण पोटात जेव्हा अन्न जाते, त्यात अॅसिड मिसळले जातात. जेव्हा पोटातून अन्न उलटीद्वारे तोंडात येते, तेव्हा तोंडात अॅसिड असते. यादरम्यान दात घासणे टाळावे. उलटी केल्यानंतर दात घासणे म्हणजे ॲसिड घासणे. यामुळे दात अधिक कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे यादरम्यान दात घासू नये.
पावसाळ्यात घरात डास - चिलटांचा उच्छाद? ४ घरगुती उपाय, त्रास होईल कमी - घर स्वच्छ
दात अकाली तुटू शकतात
दात ॲसिडच्या संपर्कात आल्याने, दात कमकुवत होऊ शकतात. दातांची योग्य काळजी नाही घेतल्यास वेदना, इन्फेक्शन आणि दात कमकुवत होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.