Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लहान मुलांच्या अंगात रक्त कमी! ॲनिमियाने मुलं आजारी असण्याची २ महत्त्वाची गंभीर कारणं..

लहान मुलांच्या अंगात रक्त कमी! ॲनिमियाने मुलं आजारी असण्याची २ महत्त्वाची गंभीर कारणं..

2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips : ६ ते ५९ महिने या वयोगटातील ५४. ६ टक्के मुलं ॲनिमिक आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 05:13 PM2023-10-13T17:13:19+5:302023-10-13T17:14:46+5:30

2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips : ६ ते ५९ महिने या वयोगटातील ५४. ६ टक्के मुलं ॲनिमिक आहेत

2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips :Less blood in children! 2 important serious reasons why children are sick with anemia... | लहान मुलांच्या अंगात रक्त कमी! ॲनिमियाने मुलं आजारी असण्याची २ महत्त्वाची गंभीर कारणं..

लहान मुलांच्या अंगात रक्त कमी! ॲनिमियाने मुलं आजारी असण्याची २ महत्त्वाची गंभीर कारणं..

लहान मुलांमधील अॅनिमिया ही गेल्या काही वर्षातली महत्त्वाची तक्रार असल्याचे दिसते. शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी झाल्याने अॅनिमिया होतो. यामध्ये लोह आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. महिलांमध्ये अॅनिमियाची तक्रार असते हे आपल्याला माहित आहे. पण लहान मुलांमध्ये ही तक्रार असेल तर तीही नक्कीच चिंतेची बाब आहे हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. लक्ष स्थिर नसणे, सतत येणारा थकवा, झोप, भूक न लागणे ही अॅनिमियाची काही महत्त्वाची लक्षणे आहेत. या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर ते लोहाची सप्लिमेंटस देतात. पण त्यापेक्षा आहारात काही किमान बदल केल्यास ही समस्या नक्कीच दूर करता येऊ शकते. लहान मुलांमध्ये आहाराबाबत २ महत्त्वाच्या चुका किंवा दुर्लक्ष पालकांकडून होते. ते कोणते आणि त्यामुळे अॅनिमिया कशाप्रकारे वाढतो हे समजून घ्यायला हवे (2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips).  

National Family Health Survey यांच्या नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणानुसार चंदीगढ येथे झालेल्या ‘Child Feeding Practices and Nutritional Status of Children’ या अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की चंदीगढ येथील ६ ते ५९ महिने या वयोगटातील ५४. ६ टक्के मुलं ॲनिमिक आहेत. बरेचदा मुलांना दूध खूप जास्त आवडते तर काही वेळा मुलांनी दूध प्यावे हा पालकांचा अट्टाहास असतो. जास्त प्रमाणात दूध घेतल्यामुळे शरीरातील लोहनिर्मिती कमी होते आणि त्यामुळे लहान मुलांना ॲनिमियाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे मुले दूध प्यायला नकार देत असतील, तर त्यासाठी खूप चिंता करण्याची गरज नाही. दुधाव्यतिरिक्त इतर अनेक पौष्टिक पदार्थ खाऊ घालून मुलांचे पोषण होऊ शकते. 

(Image : Google )
(Image : Google )

डॉ. छाया शाह सांगतात...

१. मुलांच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश न करणे यामुळे मुलांमध्ये अॅनिमिया वाढण्याची शक्यता असते. यामध्ये लिंबू, संत्री, मोसंबी यांबरोबरच बऱ्याच घटकांचा समावेश होतो. भारतात बऱ्याच पालकांमध्ये लिंबामुळे मुलांना सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते हा गैरसमज असतो. पण लिंबाचा आहारात समावेश केल्याने पालक, कडधान्ये, डाळी यांसारख्या शाकाहारी अन्नपदार्थांमधील लोह शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाण्यास मदत होते. म्हणूनच मुलांना वरण भातावर रोजच्या रोज लिंबू पिळायलाच हवे. 

२. मुलं जेवायला किंवा नाश्ता करायला नाही म्हणतात तेव्हा त्यांना मोठमोठे मग भरुन दूध पाजणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. काही पालक तर मुलांना दिवसभरात १ लीटर दूध देतात. पण दूध हा लोहाचा स्त्रोत नसल्याने त्यातून शरीराला लोह मिळत नाही. त्यामुळे लोहाची कमतरता कायम राहते आणि दुधामुळे कॉन्स्टीपेशन होण्याचीही शक्यता असल्याने मुलांचे पोट वेळच्या वेळी नीट साफ होण्यास अडचणी येतात. त्यामुळे मुलं जेवायला किंवा नाश्त्याला नको म्हणत असतील तरीही त्यांना ७०० मिलीलीटरपेक्षा जास्त दूध देणे योग्य नाही. आपण जे पदार्थ केले आहेत ते त्यांना देत राहा, कधी ना कधी ते हे पदार्थ नक्की खातील.   
 


 

Web Title: 2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips :Less blood in children! 2 important serious reasons why children are sick with anemia...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.