Join us   

इवल्याश्या बियांतून मिळते भरपूर पोषण; कॅल्शियमचा आहे खजिना, वाढेल ताकद - दिसाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2024 1:46 PM

2 Super Healthy Seeds You Should Eat Daily : साठीपर्यंत हाडं होणार नाही ठिसूळ; फक्त रोज 'या' बिया भाजून खा..

उत्तम आरोग्यासाठी आहारात बियांचं समावेश करणं गरजेचं आहे (Health Tips). नियमित भाजलेले सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदय निरोगी राहते, हाडे मजबूत होतात, थायरॉईड, केस आणि त्वचेच्या समस्या दूर होतात (Calcium rich). आपण आपल्या आहारात सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बियांचा समावेश करा. यातील पौष्टीक घटक आरोग्याच्या अनेक समस्या दूर करतील.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, 'आहारात सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बियांचा समावेश करा. या बिया नियमित खाल्ल्याने झोप, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शिवाय लठ्ठपणा, प्रोस्टेट, कोलन आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो'(2 Super Healthy Seeds You Should Eat Daily).

ब्रश करण्याआधी आणि नंतर काय खाऊ नये? ब्रश करताना आपणही 'ही' चूक करता का?

भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे अनेक फायदे आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट, गुड फॅट्स आणि खनिजे आढळतात. ज्यामुळे हाडं, लैंगिक आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत होते.'

सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे

बॅड कोलेस्टेरॉल होते कमी

सूर्यफुल आणि भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. ज्यामुळे रक्ताभिसरणात कोणतीही अडचण येत नाही. यात ट्रिप्टोफॅन आढळते , ज्यामुळे उत्तम झोप लागते.

वजन नियंत्रणात राहते

सूर्यफुल आणि भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे अधिक वेळ भूक लागत नाही. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, शिवाय रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

स्तनाच्या कर्करोगाचा धोका होतो कमी

सूर्यफुल आणि भोपळ्याच्या बियांमध्ये फायटोएस्ट्रोजेन आढळते. ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. आपण आपल्याला आहारात सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकता.

मेंदू तीक्ष्ण होते

सूर्यफुल आणि भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी ६ असते. जे स्मरणशक्ती सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते. यासह पीएमएस (प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम)च्या निगडीत समस्या देखील कमी करण्यास मदत करते.

वेट लॉससाठी रोज फक्त 'एवढ्या' स्टेप्स पूर्ण करा, थुलथुलीत पोट - मांड्या होतील कमी; महिनाभरात दिसेल फरक

शरीरात रक्त तयार होते

या बियांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे केस, त्वचा आणि उर्जा पातळी सुधारेल. सूर्यफुलाच्या बिया डिटॉक्सिफाईंग आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.

या प्रकारे करा बियांचे सेवन

सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया खाण्यापूर्वी पाण्यात भिजत किंवा भाजून खा. भिजवून किंवा भाजून खाल्ल्याने त्यातील फायटिक ऍसिड/टॅनिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे पोषक तत्व सहजपणे शरीरात शोषले जातात. सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया समान प्रमाणात मिसळा, आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा.

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य