Join us   

१०० वर्षे ठणठणीत जगण्याचं सिक्रेट, संशोधन सांगते शंभरी गाठणारी माणसं नक्की खातात काय..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 3:06 PM

2 Top Ways to Live Longer : ब्लू जोनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट हेच आहे की ते वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांचे अधिकाधिक सेवन करतात.

आपल्याला निरोगी दीर्घायुष्य मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक संतुलित आहार घेणं, जीममध्ये तासनतास घाम गाळणं या गोष्टींचा रुटीमध्ये समावेश करतात. (Things to Stop Doing If You Want a Longer Life) आहारात जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश केल्यास तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता. भाज्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात पण जास्तीत जास्त लोकांना भाज्या खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. (Longevity long life ways include 4 easy habits in your lifestyle to live 100 plus age)

रोजच्या जेवणात कोणता बदल करावा?

लोक भाजीची चव वाढवण्यासाठी त्यात तेल आणि मसाल्यांचा जास्त वापर करतात. ज्यामुळे भाज्यांमधील पोषक तत्व नष्ट होतात. भाज्यांचे पोषक तत्व कमी होऊ न देता भाज्यांचे सेवन कसे करावे याबाबत समजून घ्यायला हवं. ज्यामुळे त्यातील पोषक तत्व पुरेपूर मिळतील आणि भाज्यांची चव सुद्धा वाढेल.

भाज्यांमध्ये मांसाप्रमाणे स्वत:ची वेगळी चव नसते. म्हणूनच मसाले, तीळ-ऑलिव्ह ऑईलचा वापर करून भाज्या बनवल्या जातात. ब्लू जोनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट हेच आहे की ते वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांचे अधिकाधिक सेवन करतात.

संशोधक डॅन ब्युटनर यांच्यामते जगभरात अशी काही ठिकाणं आहेत जी ब्लू झोनच्या नावाने ओळखली जाते. या ठिकाणचे लोक १०० वर्षांपेक्षा जास्त जगतात. या ठिकाणचे रहिवासी झाडांपासून मिळणारे अन्न  जसं की बीया, धान्य, भाज्या जास्तीत जास्त खातात.

नॅशनल ज्योग्राफिक एक्सप्लोरर आणि लेखक डॅन  बुएटनर यांच्यानुसार आयुष्य वाढवण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतात. १०० वर्षांपेक्षा जास्त जगणारे लोक इटली,  कोस्टा रिका, जपान या ठिकाणचे आहेत. रिसर्चनुसार  जे लोक जास्त  काळ जगले त्यांना जास्त ताण न घेणं, डान्स करणे या सवयी होत्या.

दीर्घायुष्यासाठी हेल्दी कार्ब्स, रताळे, होल ग्रेन अन्नाचे सेवन करायला हवे. डान्स करणं ही उत्तम फिजिकल एक्टिव्हिटी आहे जी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली असते.  जास्त स्ट्रेस व्यक्तीसाठी घातक ठरतो. यामुळे कमी वयात आरोग्याच्या समस्या उद्भवतात म्हणून कमीत कमी ताण घ्या.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य