लहान मुलं घरात असली की त्यांचा सतत चॉकलेट खाण्याचा हट्ट असतो आणि पालक त्यांना चॉकलेट खाऊ नको म्हणून रागवत असतात. पालकांचं काहीही चुकीचं नाही. पण चॉकलेट खाण्याचे हे काही फायदे जर तुम्ही वाचले तर लहान मुलांचं तर सोडाच पण तुम्ही स्वतःच रोज एक तुकडा तरी चॉकलेटचा नक्कीच खाल. जर योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्लं तर ते आरोग्यासाठी अतिशय पोषक ठरू शकतं असं सांगणारे अनेक अभ्यास आजपर्यंत तज्ज्ञ मंडळींनी केलेले आहेत. त्यामुळे नेमके फायदे कोणते आणि त्यासाठी कुठलं चॉकलेट किती प्रमाणात खावं हे आता आपण पाहूया...(3 Amazing Health Benefits Of Eating Chocolate Every Day)
चॉकलेट खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
१. चॉकलेट खाणं कसं आरोग्यदायी ठरू शकतं याविषयी डॉ. पियुष मिश्रा यांनी दिलेली माहिती नवभारत टाइम्सने प्रकाशित केली आहे. त्यानुसार डॉक्टर असं सांगत आहे की जर तुम्ही दररोज डार्क चॉकलेटचा एक लहानसा तुकडा खाल्ला तर त्यातून तुम्हाला जवळपास ६४ एमजी एवढ्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळू शकतं.
लग्नकार्यात अंगावर हवीच ठसठशीत 'टेम्पल ज्वेलरी', बघतच राहावे असे ८ सुंदर प्रकार
चांगली शांत झोप येण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांनी दररोज रात्री झोपण्याच्या आधी डार्क चॉकलेटचा एखादा तुकडा खावा.
२. डार्क चॉकलेटमध्ये बऱ्याच प्रमाणात ॲन्टीऑक्सीडंट्स असतात. त्यामुळे शरीर आणि मेंदू दोघांसाठीही डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर ठरतं.
३. डार्क चॉकलेटमध्ये असणारे काही घटक रोगप्रतिपारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात, असंही काही अभ्यासावरून समोर आलेलं आहे. त्यामुळे दररोज डार्क चाॅकलेट खायला हरकत नाही. पण त्याचं प्रमाण किती असावं ते पाहा..
कोण म्हणतं पन्हं करण्याचं काम खूप किचकट आहे? घ्या सोपी रेसिपी- झटपट पन्हं तयार
दररोज किती प्रमाणात चॉकलेट खावं?
चॉकलेट खाण्याचे फायदे या संदर्भात जे काही अभ्यास झालेले आहेत त्यानुसार दिवसातून २० ते ३० ग्रॅम म्हणजेच एक किंवा दोन छोटे तुकडे एवढ्याच प्रमाणात डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर आहे.
टरबूज खरेदी करायचंय? साध्या सोप्या ३ टिप्स- काही सेकंदातच ओळखा कोणतं टरबूज गोड निघणार
जर तुम्ही त्यापेक्षा जास्त प्रमाणात खात असाल तर मात्र शरीरातील साखरेचे आणि कॅफिनचे प्रमाण वाढू शकते आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही डार्क चॉकलेट खरेदी कराल तेव्हा त्यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त कोको पावडर असेल याकडे लक्ष द्या..