व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला जमत नाही. आरोग्याच्या संबंधित अनेक आजार निर्माण होतात. आपण आजारी पडल्यावर दूध पिण्याचा सल्ला अनेकांकडून मिळतो. दुधामध्ये जवळपास सर्व प्रकारची पोषक तत्वे असतात, म्हणूनच त्याला संपूर्ण आहाराचा दर्जा दिला जातो. दुधात इतर साहित्य मिसळून प्यायल्यास त्यातील पौष्टीक गुणधर्म दुप्पटीने वाढतात.
यासंदर्भात, पोषण तज्ज्ञ निखिल वत्स सांगतात, ''जर आपण दिवसातून २ ग्लास दूध प्यायलो तर शरीराला अनेक फायदे मिळतात. त्याचप्रमाणे गरम दुधात तूप मिसळून प्यायल्यास त्याची पौष्टिकता वाढते. तुपात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के आणि ई सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे आरोग्य सुधारते.'' दुधात तूप मिसळून प्यायल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात हे पाहूयात(3 Benefits Of Drinking Ghee With Milk At Night).
गरम दुधात तूप मिसळून प्यायल्याने कोणते फायदे होतात?
सांधेदुखीवर आराम
जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल तर, गरम दुधात तूप मिसळून प्या. दुधात सांध्यातील इंफ्लेमेशन कमी करण्याची क्षमता असते. ज्यामुळे सांधेदुखी होत नाही. दुधामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात.
शांत झोप
रात्री झोपण्यापूर्वी दुधात तूप मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दूध आपल्या मेंदूच्या मज्जातंतूंना शांत करते. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. दुसरीकडे, तुपाच्या सेवनाने तणाव कमी होतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा
पचनक्रिया सुधारते
दूध आणि तूप यांचे मिश्रण आपल्या पोटासाठी खूप चांगले आहे, ते प्यायल्याने पाचक एंजाइम बाहेर पडतात. ज्यामुळे पचन आणखी चांगले होते. अशा स्थितीत अपचन, बद्धकोष्ठता, गॅस सारख्या समस्या आपल्याला छळत नाही.