Join us   

उलटे चालण्याचे ३ फायदे, सिधे रस्ते की उलटी चाल, गुडघेदुखी कमी - मेंदुलाही द्या चालना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2022 6:41 PM

Upside Down Walk चालणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम मानला जातो. मात्र, त्याहून प्रभावी व्यायाम उलटे चालणे आहे. कॅलरीज बर्न करण्यासह गुडघेदुखी होते दूर

फिट आणि तंदुरस्त राहण्यासाठी चालणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. दिवसातून पंधरा ते वीस मिनिटे चालल्याने शरीरातील बरीच अतिरिक्त चरबी कमी होते. नियमित चालण्याची सवयी ठेवल्याने वजन तर कमी होतेच यासह इतर आजार शरीरात उद्भवत नाही. सरळ चालण्याचे फायदे अनेक आहेत. मात्र, आपण कधी रिवर्स वॉकिंग करून पाहिली आहे का ? रिवर्स वॉकिंगचे आश्चर्यकारक फायदे आहेत. उलट्या दिशेने चालणे आणि धावणे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. हा एक उत्तम कार्डिओचा प्रकार असून, याने वजन कमी होण्यास मदत होते. यासह इतर भन्नाट फायदे देखील आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतात.

स्पोर्ट्स मेडिसिनच्या इंटरनॅशनल जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या अहवालानुसार, ''ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास  किंवा पायांना दुखापत झालेली आहे, त्यांनी रिव्हर्स वॉकिंग करून व्यायाम करावा. असे केल्याने वेदनांपासून आराम मिळतो, यासह पायांवर देखील कमी दबाव पडतो.''

रिवर्स वॉकिंगचे भन्नाट फायदे

पायांना बनवते मजबूत

साधारणपणे आपण पुढच्या दिशेने चालत असतो. त्यामुळे आपल्या पायांच्या मागच्या भागात असलेल्या स्नायूंचा वापर होत नाही. जेव्हा तुम्ही उलटे चालता तेव्हा ते स्नायू गतिमान होतात आणि पाय मजबूत होतात. याशिवाय, जर तुम्हाला पाठदुखीपासून मुक्ती हवी असेल, तर दररोज किमान 15 मिनिटे रिव्हर्स वॉकिंग करा.

कॅलरीज बर्न करण्यात प्रभावी

जॉगिंग अथवा रिवर्स वॉकिंग केल्याने कॅलरीज अधिक प्रमाणावर बर्न होण्यास मदत मिळते. सामान्य चालल्याने जितके बर्न होत नाहीत तितके रिवर्स वॉकिंग केल्याने होते.

मानसिक स्थिती सुधारण्यास मदत

उलटे चालणे केवळ शारीरिकच नाही तर, मानसिकदृष्ट्याही निरोगी ठेवण्यास मदत करतात. जेव्हा आपण उलट्या दिशेने चालतो, तेव्हा आपले संपूर्ण लक्ष आपल्या पायांवर असते. कधी कधी सरळ दिशेने चालत असताना आपल्या मनात असंख्य गोष्टी चालू असतात. त्यामुळे उलटे चालणे आपल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम मानले जाते.

कोणी रिवर्स वॉकिंग करू नये

गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, स्ट्रोक रूग्ण किंवा ज्यांना संतुलन राखण्यास कमतरता जाणवते. त्यांनी रिवर्स वॉकिंग  करू नये. जर आपल्याला रिवर्स वॉकिंग करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स