Join us   

मधुमेह होऊ नये म्हणून काय करावं? ३ गंभीर चुका वेळीच टाळा; अन्यथा वजन वाढेल आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 7:53 PM

3 Diabetes Mistakes and How to Avoid Them : ‘या’ ३ कारणांमुळे लोकांना होतो मधुमेह, ही चूक तुम्ही तर करत नाही ना?

आजकाल खराब जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढत आहे (Diabetes). ज्यात मधुमेहाचा देखील समावेश आहे. व्यायामाचा अभाव आणि पौष्टीक आहार न खाल्ल्यामुळे मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे (Health Tips).  भारतात सुमारे ७.७ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. मुख्य म्हणजे कमी वयोगटातील लोकंही मधुमेहाच्या विळख्यात अडकत आहेत. पण या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. जर आपल्याला मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर, डॉ. इम्रान अहमद यांनी शेअर केलेल्या काही सवयी बदलून पाहा.

यासंदर्भात तज्ज्ञ म्हणतात, 'काही जणांना मधुमेह अनुवांशिक कारणांमुळे होते. तर काहींना त्यांच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे होते. चुकीचा आहार, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यासह इतर कारणांमुळे मधुमेह होऊ शकते. चांगल्या सवयी अंगीकारल्याने शरीर सुदृढ राहील, मधुमेहाचा धोका टळू शकतो'(3 Diabetes Mistakes and How to Avoid Them).

झोपेचा अभाव

उत्तम आरोग्यासाठी किमान ७ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे. तसे न केल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, मधुमेह देखील त्यापैकी एक आहे. कमी झोप घेतल्याने भूक नियंत्रित करणाऱ्या आणि रक्तातील ग्लुकोज टिकवून ठेवणाऱ्या हार्मोन्सचा प्रभाव कमी होतो. ज्यामुळे वजन वाढते, आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

मुलांच्या बळकट हाडांसाठी फक्त दूध पुरेसं नाही, चमचाभर ‘ही’ पावडर दुधात घाला, हाडं होतील मजबूत

नाश्ता स्किप करणे

अनेकजण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्याच्या घाईत नाश्ता स्किप करतात. पण यामुळे आपल्या आरोग्याला खूप हानी पोहोचते. नाश्ता न केल्याने दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागते, त्यामुळे रक्तातील साखर आणि इन्शुलिनची पातळी वाढते. त्यामुळे सकाळचा नाश्ता नेहमी करायला हवा. हेल्दी पदार्थांनी दिवसाची सुरुवात करा.

आशा भोसले सांगतात त्यांच्या आवडीच्या सोलकढीची रेसिपी, अस्सल चव आणि करायलाही सोपी

रात्रीच्या जेवणानंतर खाण्याची सवय

रात्रीच्या वेळी खाण्यापिण्याची सवय ही मधुमेह होण्याला बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. त्यामुळे डिनरमध्ये हलका आणि सकस आहार घ्यावा. उलट - सुलट पदार्थ आजपासून खाणं सोडा. कारण तेलकट आणि चुकीच्या आहारामुळे रक्तातील साखर वाढू शकते. रात्रीच्या वेळेस अनहेल्दी चिप्स स्नॅक्स खाण्याऐवजी ड्रायफ्रुट्स खा. 

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य