Join us   

लहान मुलांमधील लठ्ठपणा वाढविणारे ३ पदार्थ; बघून घ्या तुमची मुलंही 'हे' पदार्थ खातात का....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2024 12:35 PM

Avoid These 3 Food Items For Your Kids: लहान मुलांमधील स्थुलता (obesity) वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणारे हे ३ पदार्थ तुमची मुलं किती प्रमाणात खातात, हे एकदा तपासून पाहा...

ठळक मुद्दे हे ३ पदार्थ तुमच्या घरातून हद्दपार करा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. 

हल्ली बहुतांश लहान मुलांचा आहार अगदी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. वरण- भात, भाजी- पोळी, चटणी, लोणचं, कोशिंबीर असं सगळं ताटात घेऊन जेवणारी लहान मुलं हल्ली कमीच दिसतात. त्यातच मैदानी खेळ खेळणं जवळपास बंद झाल्यासारखंच आहे. त्यामुळे चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. काही मुलं अगदीच कृश आहेत तर काही स्थूल. मुलांमधील स्थूलता वाढविण्यासाठी इतरही अनेक घटक कारणीभूत असले तरी काही पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे मुलांमधील स्थुलता वाढते आहे (Harmful food for kids). ते पदार्थ कोणते त्याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती बघा... (3 Food items that causes obesity and pre diabetic stage in your kids)

लहान मुलांमधील स्थुलता वाढविणारे पदार्थ

 

कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांना लठ्ठपणा, मधुमेह, हायपरटेंशन असा त्रास होत आहे, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr_ajayprakash_pediatrician या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. बघा तुमची मुलं यातला कोणता पदार्थ किती प्रमाणात खातात...

१. जॅम आणि जेली

पराठा, पोळी यांना लावून अनेक मुलं जॅम आणि जेली खातात. त्याच्या नादाने मुलं पोळी किंवा पराठा खातात, म्हणून पालकही त्यांना सर्रासपणे ते पदार्थ खाऊ घालतात.

साध्या डोशाला मसाला डोसा व्हायला लागली ८०० वर्षे! आर. माधवनचं भन्नाट लॉजिक-व्हायरल पोस्ट

पण यामुळे मुलांच्या पोटात खूप जास्त प्रमाणात प्रोसेस्ड शुगर जाते. त्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढते तसेच मधुमेह आणि लठ्ठपणाही वाढतो. 

 

२. मेयोनिज

या पदार्थाचं वर्णन व्हाईट पॉयझन अशा शब्दांत डॉक्टरांनी केलं आहे. त्यांच्यामते मेयोनिजमध्ये हायड्रोजनेटेड ऑईल खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे हायपरटेंशन, मधुमेह आणि लठ्ठपणा असा त्रास मुलांना होऊ शकतो. 

 

३. सॉस किंवा केचअप

हल्ली बहुतांश मुलं पराठ्यांसोबत सॉस किंवा केचअप खातात. ब्रेडला लावूनही सॉस खाल्ला जातो. सॉस किंवा केचअपमध्ये साखर आणि मीठ खूप जास्त प्रमाणात असते.

महागड्या सिल्कच्या साडीवर पदार्थ सांडून डाग पडला? २ उपाय- साडीवरचा डाग होईल गायब 

अतिरिक्त मीठामुळे मुलांमध्ये किडनी स्टोन, नॉशिया, डोकेदुखी असा त्रास दिसू शकतो. तसेच खूप जास्त साखर असणे म्हणजे मधुमेह आणि लठ्ठपणा यांना निमंत्रण. त्यामुळे हे ३ पदार्थ तुमच्या घरातून हद्दपार करा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. 

 

टॅग्स : आरोग्यलहान मुलंअन्नहेल्थ टिप्सपालकत्व