गरमीच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं सेवन केलं जातं. यामुळे फक्त शरीर थंड राहत नाही तर पचन तंत्र सुधारण्यासही मदत होते. दह्यात कॅल्शियम, प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात असतात. याच्या नियमित सेवनानं हाडं, मांसपेशी निरोगी राहण्यास मदत होते. आयुर्वेदात दही खाण्याचे बरेच फायदे सांगितले आहेत. लोक जेवणात वाटीभर दही खातात तर काहीजण ताकाचं सेवन करतात.( which should not eat with curd)
काहीजण दह्यामध्ये साखर, कापलेली फळं टाकून खातात. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दही खाण्याचे काही नियम सांगितले आहेत. काही पदार्थ दह्यासोबत खाल्ल्यानं पोटात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात. (3 Foods never eat with curd that can produce toxins in the body according ayurveda expert)
फळं खाऊ नका
अनेकजण दह्यासोबत फळांचे सेवन करतात. दह्यासोबत फळांचे सेवन केल्याने पोट आणि आतड्यांच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. दीर्घकालीन वापरामुळे चयापचय समस्या आणि एलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते.
रोज किती पाऊलं चालल्यानं वजन पटापट कमी होतं? सुडौल, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...
मांसयुक्त पदार्थांचे सेवन करू नका
दह्यासोबत चिकन, मटण किंवा मासे यांसारखे मांसाचे सेवन आरोग्यासाठी घातक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. चिकन, मटण किंवा मासे अशा अनेक पदार्थांमध्ये दही वापरले जाते हे आपण अनेकदा पाहिले असेल. या मिश्रणाने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.
दही गरम करू नका
डॉक्टरांनी सांगितले की, दही कधीही गरम करू नये. दही गरम झाल्यावर त्याचे गुणधर्म कमी होतात. याशिवाय लठ्ठपणा, कफ, रक्तस्रावाचे विकार आणि सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी दही खाणे टाळावे.