Join us   

बॅड कोलेस्टेरॉल वाढलंय? कणकेत ‘हे’ ३ पदार्थ मिसळून पोळ्या करा-वजन तर घटेलच, कोलेस्टेरॉलही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 7:08 PM

3 foods that lower cholesterol: Diet, what to limit, and more : हृदयाचे आरोग्य जपा; बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ३ पदार्थ रोज खा

एचडीएल आणि एलडीएल असे कोलेस्टेरॉलचे (Bad Cholesterol) दोन प्रकार असतात. एचडीएल म्हणजे गुड तर  एलडीएक एक पिवळा, घातक- चिकट पदार्थ असतो, ज्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात (Health Tips). नसांच्या भिंतींना हा पदार्थ चिकटतो. ज्यामुळे रक्ताभिसरणात (Blood Circulation) अडचण येते. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यासह शरीराच्या वेगवेगळ्या भागांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात बरेच बदल दिसून येतात. यामुळे गुडघे दुखणं, डोळ्यांच्या वर जाड थर तयार होणं, पायांच्या नसा हिरव्या दिसून येणं. असे काही लक्षणं दिसून येतात. पण यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यामागे ज्यापद्धतीने अन्नपदार्थ जबाबदार आहेत, त्या पद्धतीने काही पदार्थ खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात येऊ शकते(3 foods that lower cholesterol: Diet, what to limit, and more).

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

अळशीच्या बिया

द हेल्थ साईट. कॉमच्या मते, नैसर्गिकरित्या वेट लॉस आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर, फायबर समृद्ध अळशीच्या बियांचा आहारात समावेश करा. बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी हे प्रभावी मानले जाते. फ्लॅक्ससीडमध्ये आढळणारा फायबर शरीरात पोहोचतो आणि खराब कोलेस्टेरॉल शोषून घेतो. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने कमी होऊ लागते. आपण फ्लॅक्ससीडची पावडर कणिक मळताना त्यात मिक्स करू शकता, आणि त्याच्या पोळ्या खाऊ शकता.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

ओट्स

नाश्त्याला बरेच जण ओट्स खातात. ओट्स हेल्दी मानले जातात. ओट्समधील कार्बोहायड्रेट्समुळे पचनसंस्था सुरळीत कार्य करते. जर आपण नियमित गव्हाच्या पोळ्या खात असाल तर, कणिक मळताना त्यात ओट्स घाला. यातील फायबर शरीरात पोहोचताच बॅड कोलेस्टेरॉल शोषून घेण्याचं काम करेल.

बेसन

गव्हाच्या पिठाच्या तुलनेत बेसनामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. म्हणूनच मधुमेहग्रस्त रुग्ण, लठ्ठ लोक आणि ज्यांना बॅड कोलेस्टेरॉलची समस्या आहे, त्यांनी आहारात बेसनाच्या पोळीचा समावेश करावा. यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य