पालक पनीर ही रेसिपी प्रत्येकाला आवडते. पनीर हा पदार्थ प्रत्येक भाजीत सहज समाविष्ट होतो. तज्ज्ञांच्या मते असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचे एकत्र सेवन करणे चुकीचे ठरते, असे केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर नाही. अशा परिस्थितीत हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. पालक आणि पनीर देखील एकत्र सेवन करू नये. पोषणतज्ञ नमामी अग्रवाल यांच्या माहितीनुसार, "निरोगी खाणे म्हणजे फक्त योग्य पदार्थ खाणे नव्हे. याचा अर्थ योग्य संयोजनात योग्य पदार्थ खाणे. असे काही कॉम्बिनेशन्स आहेत, जे एकत्र खाल्ल्याने एकमेकांचे पोषक घटक संपतात, म्हणजेच ते शोषून घेतात. त्याचा आपल्याला शरीरावर फायदा होत नाही."
पनीर पालकासोबत खाऊ नये
तज्ज्ञांच्या मते पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि पनीरमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास कॅल्शियम लोहाचे पोषक तत्व काढून घेते आणि शरीराला लोह मिळू शकत नाही. म्हणूनच लोहासोबत कॅल्शियमचे सेवन करू नये.
जेवल्यानंतर चहा पिऊ नये
त्याचवेळी पोषणतज्ञ आणि डीटीएफच्या संस्थापक सोनिया बक्षी यांनी सांगितले की, दूध, चहा, कॉफी किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांसोबत लोह सप्लिमेंट्सचे सेवन करू नये.
डाळीबरोबर दही खाऊ नये
सोनिया म्हणाल्या की, डाळ आणि सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे दही चणे, राजमा आणि डाळ यांच्यासोबत खाऊ नये.