Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दूध- पोळी आवडीने खाता, मुलांनाही खाऊ घालता? गंभीर आजारांचा धोका! डॉक्टर सांगतात...

दूध- पोळी आवडीने खाता, मुलांनाही खाऊ घालता? गंभीर आजारांचा धोका! डॉक्टर सांगतात...

3 Foods To Avoid Consuming With Milk: दुधासोबत कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे याचा नियम कटाक्षाने पाळायला हवा असं आयुर्वेदिक डाॅक्टर सांगतात..(3 foods you should never have with milk according to Ayurveda)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 09:20 IST2025-03-01T09:14:28+5:302025-03-01T09:20:01+5:30

3 Foods To Avoid Consuming With Milk: दुधासोबत कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे याचा नियम कटाक्षाने पाळायला हवा असं आयुर्वेदिक डाॅक्टर सांगतात..(3 foods you should never have with milk according to Ayurveda)

3 foods to avoid consuming with milk, 3 foods you should never have with milk according to Ayurveda | दूध- पोळी आवडीने खाता, मुलांनाही खाऊ घालता? गंभीर आजारांचा धोका! डॉक्टर सांगतात...

दूध- पोळी आवडीने खाता, मुलांनाही खाऊ घालता? गंभीर आजारांचा धोका! डॉक्टर सांगतात...

Highlightsया सगळ्या गोष्टी स्लो पॉईझनिंगप्रमाणे तुमच्या शरीरात काम करतात आणि कालांतराने त्याचे आरोग्यावर परिणाम दिसून येतात, असं डॉक्टर सांगतात. 

दूध हे पुर्णअन्न मानलं जातं. ते पौष्टिक तर आहेच; त्यामुळे नियमितपणे आपल्या आहारात दूध असायला हवं. पण दूध किंवा दुधाचे पदार्थ खाताना काही गोष्टींचं पथ्य पाळायला हवं. दुधासोबत कोणते पदार्थ खावे आणि काेणते पदार्थ टाळावे याचेही आयुर्वेदानुसार काही नियम आहेत. ते नियम एकतर आपल्याला माहितीच नाहीत किंवा मग माहिती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो (3 foods to avoid consuming with milk). त्यामुळे मग भविष्यात आपल्याला त्वचेसंदर्भात काही आजार होण्याचा धोका असतो, असं डाॅक्टर सांगतात.(3 foods you should never have with milk according to Ayurveda)

दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत?

 

दुधासोबत कोणते पदार्थ खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी Dr. Rucha Mehendale Pai या सोशल मिडिया पेजवर शेअर केला आहे. दूध आणि फळं एकत्र खाऊ नयेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फळांचे मिल्कशेक पिणं आरोग्यासाठी अयोग्य आहेत. पण त्यासोबतच डॉक्टरांनी असे काही दोन पदार्थ सांगितले आहेत जे अगदी सर्रासपणे बहुतांश घरांमध्ये दुधासोबत खाल्ले जातात. त्यातला पहिला पदार्थ आहे दूध आणि पोळी. डॉक्टर सांगतात की आयुर्वेदानुसार दूध आणि गहू, दूध आणि मीठ हा विरुद्ध आहार मानला गेला आहे. 

 

आपण जेव्हा पोळ्याा करतो तेव्हा कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ सुद्धा घालतो. दुधामध्ये पोळी कुस्करून खाण्याची सवय अनेकांना असते. काही घरांमध्ये तर लहान मुलांनाही दूध- पोळी खाऊ घातली जाते. म्हणजेच दुधासोबत आणि मीठ आणि गहू हे दोन्ही विरुद्ध पदार्थ आपण सर्रास खातो. यामुळे भविष्यात त्वचा रोग होऊ शकतो. तसेच दूध- भात खातानाही त्यात अनेकजण मीठ घालतात. चहापोळी खाण्याची सवयही अनेकांना असते. या सवयी त्वचेसाठी अजिबातच चांगल्या नाहीत. आज असं खाल्लं तर उद्या लगेच तुम्हाला त्रास होईल असं नाही. या सगळ्या गोष्टी स्लो पॉईझनिंगप्रमाणे तुमच्या शरीरात काम करतात आणि कालांतराने त्याचे आरोग्यावर परिणाम दिसून येतात, असं डॉक्टर सांगतात. 

 

Web Title: 3 foods to avoid consuming with milk, 3 foods you should never have with milk according to Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.