Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कॅन्सरपासून दूर राहायचे तर किचनमधून आजच हद्दपार करा ३ वस्तू, सोयीसाठी ३ चुका पडतात महागात

कॅन्सरपासून दूर राहायचे तर किचनमधून आजच हद्दपार करा ३ वस्तू, सोयीसाठी ३ चुका पडतात महागात

3 items that you should remove from kitchen to avoid Cancer : कॅन्सर होऊ नये यासाठी आपल्या जीवनशैलीत काही किमान बदल अवश्य करायला हवेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2023 01:17 PM2023-09-04T13:17:21+5:302023-09-04T14:21:44+5:30

3 items that you should remove from kitchen to avoid Cancer : कॅन्सर होऊ नये यासाठी आपल्या जीवनशैलीत काही किमान बदल अवश्य करायला हवेत.

3 items that you should remove from kitchen to avoid Cancer : Ban these 3 things from the kitchen to stay away from cancer, take care in time | कॅन्सरपासून दूर राहायचे तर किचनमधून आजच हद्दपार करा ३ वस्तू, सोयीसाठी ३ चुका पडतात महागात

कॅन्सरपासून दूर राहायचे तर किचनमधून आजच हद्दपार करा ३ वस्तू, सोयीसाठी ३ चुका पडतात महागात

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षात अतिशय वेगाने वाढली आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या थकवणारा हा आजार झाला की रुग्ण आणि कुटुंबातील सगळीच मंडळी पार हादरुन जातात. कॅन्सरच्या पेशी कशामुळे तयार होतात यामागील नेमके कारण अद्याप सापडले नसले तरी कॅन्सर होऊ नये यासाठी आपल्या जीवनशैलीत काही किमान बदल अवश्य करायला हवेत. आपण रोजच्या आयुष्यात वापरत असलेल्या काही गोष्टींमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. न्यूट्रीशनिस्ट सिमरन कौर यांनी या गोष्टींची माहिती दिली आहे. आपण आजार होऊ नयेत म्हणून आयुष्यात बरेच नियम पाळतो. ते ठिकच आहे पण त्याबरोबरच काही अतिशय लहान पण महत्त्वाच्या गोष्टी करायला हव्यात. त्यासाठी आपल्या किचनमधून फक्त ३ गोष्टी हद्दपार केल्यास त्याचा चांगलाच उपयोग होतो (3 items that you should remove from kitchen to avoid Cancer) . 

१. अॅल्युमिनिअम फॉईल

खाण्याच्या गोष्टी पॅक करण्यासाठी आपण अनेकदा अगदी सहज या फॉईलचा वापर करतो. पोळी, पराठे, सँडविच यांसारख्या गोष्टी फॉईलमध्ये अतिशय नीट राहत असल्याने आपण फॉईल वापरतो. मात्र या फॉईलमुळे त्या खाद्यपदार्थांचा स्वाद तर बदलतोच पण आरोग्यालाही हानी पोहोचते. कारण पदार्थातील अॅल्युमिनिअमचे प्रमाण यामुळे वाढण्याची शक्यता असते. मसालेदार पदार्थ किंवा गरम पदार्थ फॉईलमध्ये पॅक केल्यास ते आरोग्यासाठी घातक असतात. फॉईलमधील घटक पोटासाठी आणि एकूणच शरीरासाठी घातक असतात त्यामुळे हे फॉईल वापरणे हे कॅन्सर होण्याचे एक महत्त्वाचे कारण असते हे लक्षात घ्यायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

२. टी बॅग्ज

पातेल्यात चहा पावडर घालून चहा करण्यापेक्षा अनेकांना चहासाठी टी बॅगचा वापर करणे जास्त सोपे वाटते. आपण गरम पाण्यात ही टी बॅग घालतो त्यावेळी टी बॅगमधून या चहाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात मायक्रो आणि नॅनो प्लास्टीक सोडले जाते. यातील पॉलीप्रोपायलीन हा प्लॅस्टीकचा एक घटक आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. टी बॅग उघडली जाऊ नये म्हणून या पिशवीमध्ये एपिक्लोरोहाइड्रिन नावाचे केमिकल असते. टी बॅग उघडली जाऊ नये म्हणून या केमिकलचा वापर केला जातो. हे केमिकल गरम पाण्यात विरघळते आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. प्लास्टीकची भांडी

अनेकदा आपण अगदी सहज प्लास्टीकचे डबे, डीश, चमचे, वाट्या अशा गोष्टी वापरतो. या वस्तू स्वस्त मिळतात आणि साफ करायलाही सोप्या असतात. वजनाने हलक्या असल्याने बाहेर फिरायला जाताना या प्लास्टीकच्या वस्तू वापरणे सोयीचे असल्याने आपण त्यांचा वापर करतो. पण या प्लास्टीकमधील रासायनिक घटक अन्नपदार्थांत जाऊन आपल्या शरीरात गेल्यास त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. 


 

Web Title: 3 items that you should remove from kitchen to avoid Cancer : Ban these 3 things from the kitchen to stay away from cancer, take care in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.