Join us   

जेवणानंतर वारंवार पोट फुगते ? आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 5:02 PM

3 main cause of bloating and home remedies to get rid of acidity gas and bloating : पोट फगुणे ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा अनेकांना त्रास होतो. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार त्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या.

आपल्यापैकी बऱ्याचजणांना जेवणानंतर पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ज्यावेळी पोट फुगते त्यावेळी त्या व्यक्तीला भीती, अस्वस्थता, श्वासात जडपणा जाणवू लागतो. पोट फुगण्याची ही समस्या आपल्याला कितीही लहान वाटत असली तरीही ती एक गंभीर समस्या आहे. पोटाच्या बाबतीतल्या समस्या ह्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. या समस्या काही वेळा साधारण ही असू शकतात आणि त्या आपण घरच्याघरी सुध्दा बर्‍या करू शकतो. परंतु जर या समस्येमुळे काही मोठा आजार झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. पोट फुगणे ही एक समस्या आहे, जी आपल्याला अतिगंभीर वाटत नसल्याने आपण दुर्लक्षित करतो. 

पोट फुगण्याच्या या समस्येकडे लक्ष नाही दिले, त्यावर उपाय केले नाही तर त्रासदायक ठरू शकते. याचबरोबर या समस्येमुळे आपल्याला बराच त्रास होतो आणि यामुळे आपले कशातच लक्ष लागत नाही. या त्रासामुळे झोप सुध्दा लागत नाही किंवा कुठल्याही कामात मन लागत नाही. पटापट घाईत जेवण केले, गॅस पकडणारे चुकीचे अन्नपदार्थ खाल्ले किंवा खाण्याच्या वेळेत बदल झाला की पोट फुगण्यासारख्या समस्या उद्भवतात. पोट फुगणे ही एक साधारण समस्या जरी असली तरीही त्यावर उपाय करणे हे अतिशय महत्वाचे आहे. नाहीतर या समस्येचा आपल्याला भरपूर त्रास होऊ शकतो, त्याचबरोबर दुसरे आजार देखील उद्भवू  शकतात. आयुर्वेदिक डॉक्टर वारा लक्ष्मी यांनी सांगितले आहे की, आपल्या चुकांमुळे ब्लोटिंगची समस्या उद्भवते आणि ही समस्या टाळण्यासाठी आपण नेमके काय काय उपाय करू शकतो(3 main cause of bloating and home remedies to get rid of acidity gas and bloating).

ब्लॉटिंगची समस्या कारणे आणि उपाय :- 

१. आतड्यांसंबंधी संवेदनशीलता आणि फूड इनटोलरेन्स :- जर तुम्हाला फूड इनटोलरेन्सचा त्रास असेल तर तुमचे शरीर विशिष्ट प्रकारचे अन्न नीट पचवू शकत नाही. यामुळे पोटात गॅस, सूज आणि अस्वस्थता होऊ शकते. जर तुमचे आतडे संवेदनशील असेल, तर काही खाद्यपदार्थ अगदी कमी प्रमाणात फुगणे आणि अस्वस्थता आणू शकतात. 

गॅसमुळे पोट फुगणं, कॉन्स्टीपेशन त्रास वाढलाय? ६ उपाय, गॅस बाहेर निघेल-पोटही राहील साफ...

२. जेवताना फार बोलणे आणि सतत पाणी पिणे :- जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी उर्जेची गरज असते. जेवताना जास्त पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर जास्त दबाव पडतो आणि पचनक्रिया मंदावते. यामुळे सूज आणि अस्वस्थता होऊ शकते.

३. हळूहळू खा आणि चावून खा :- काही फूड कॉम्बिनेशन्स देखील ही समस्या वाढवतात ज्या टाळणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. तसेच आहार हळूहळू खा आणि चावून खा ज्यामुळे पचन अतिशय व्यवस्थित होते.

मला लागली कुणाची उचकी ? उचकी घालवण्यासाठी सोपे झटपट उपाय... उचकी होईल मिनिटांत गायब...

४. ​भूकेपेक्षा जास्त खाणे :- जेव्हा तुम्ही जास्त खातात, तेव्हा तुमच्या पोटाला अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे पोट फुगणे आणि अस्वस्थता ही समस्या जाणवू शकते. अशावेळी तुम्ही भुकेपेक्षा जास्त खाऊ नका.

ब्लोटिंग टाळण्यासाठी काय करावे :- 

१. जेवण आरामात चावून खा :- तुम्ही काय खातात तितकेच तुम्ही कसे खातात हे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही जास्त हवा गिळता, ज्यामुळे सूज येऊ शकते. हे टाळण्यासाठ हळूहळू खाण्याचा प्रयत्न करा आणि अन्न अधिक चांगले चावा.

२. आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करा :- भरपूर सोडियम असलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या शरीरात जास्त पाणी साठू शकते, ज्यामुळे सूज येऊ शकते. अशा स्थितीत, ही लक्षणे टाळण्यासाठी, ब्रेड रोल, पिझ्झा, सँडविच, कोल्ड कट्स आणि पॅकेज्ड सूप, खारट स्नॅक्स, चिकन इत्यादी सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.

३. पोटॅशियमचे सेवन :- ब्लोटिंगची समस्या कमी करण्यासाठी पोषणतज्ज्ञ भरपूर पोटॅशियम वापरण्याची शिफारस करतात. अशा स्थितीत केळी, रताळे, राजगिरा यातून तुम्ही तुमच्या आहारात पोटॅशियमचा समावेश करू शकता. पोटॅशियम समृध्द अन्न सोडियमच्या प्रभावांना विरोध करते आणि जळजळ कमी करण्यासाठी महत्वाचे ठरते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य