Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भात खाल्ल्याने वजन वाढते, मग पोहे खा! तज्ज्ञ सांगतात, भरपूर भाज्या घालून पोहे खाण्याचे फायदे

भात खाल्ल्याने वजन वाढते, मग पोहे खा! तज्ज्ञ सांगतात, भरपूर भाज्या घालून पोहे खाण्याचे फायदे

3 reasons why you should eat Poha instead of White Rice पोहे आपल्या आहारात पारंपारिक पदार्थ म्हणून आहेतच, नव्या डाएटमध्येही त्यांचा समावेश करता येऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 01:30 PM2023-05-22T13:30:23+5:302023-05-22T13:31:53+5:30

3 reasons why you should eat Poha instead of White Rice पोहे आपल्या आहारात पारंपारिक पदार्थ म्हणून आहेतच, नव्या डाएटमध्येही त्यांचा समावेश करता येऊ शकतो.

3 reasons why you should eat Poha instead of White Rice | भात खाल्ल्याने वजन वाढते, मग पोहे खा! तज्ज्ञ सांगतात, भरपूर भाज्या घालून पोहे खाण्याचे फायदे

भात खाल्ल्याने वजन वाढते, मग पोहे खा! तज्ज्ञ सांगतात, भरपूर भाज्या घालून पोहे खाण्याचे फायदे

महाराष्ट्रात नाश्ता म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते कांदे - पोहे. हा पदार्थ करण्यासाठी खूप सोपा आहे. काही लोकांना पोहे इतके आवडतात की, त्यांना दररोज खायला दिलं तरी, ते कंटाळत नाही. पोह्यांमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. दुसरीकडे, आजच्या काळात आपण जो भात खातो, ते पॉलिश केलेले तांदूळ असतात. पॉलिश केलेल्या तांदळात आर्सेनिक जास्त प्रमाणात आढळते.

'कंझ्युमर रिपोर्ट्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, ''जर आपण आर्सेनिक जास्त प्रमाणात खाल्ले तर, त्यामुळे त्वचा, मज्जासंस्था, पोट आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ज्ञ मॅक सिंग यांच्या मते, ''कच्चे पोहे हे फॅट आणि शुगर फ्री असतात. पोहे कमी तेलात, त्यात भाज्या मिक्स करून केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे भाताऐवजी पोहे खाणे हा उत्तम पर्याय आहे''(3 reasons why you should eat Poha instead of White Rice).

फायबर व निरोगी कर्बोदके आढळतात

१०० ग्रॅम कच्च्या पोह्यांमध्ये ७० ग्रॅम निरोगी कर्बोदके असतात. भाताप्रमाणे पोहे पॉलिश केलेले नसतात. १०० ग्रॅम सर्व्हिंगमध्ये ४ ग्रॅम फायबर असते. फॅट फ्री असण्यासोबतच त्यात उच्च फायबर असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? १० वाजता झोपल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात?

आयर्नने समृद्ध

जेव्हा तांदळापासून पोहे तयार केले जातात, तेव्हा त्यातील आयर्नचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे, त्यांनी त्यांच्या आहारात पोह्यांचा समावेश करावा. पोह्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. पोहे खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता भासत नाही.

ताक आणि राजगिरा खाऊन सुटलेलं पोट कमी होईल? खा ५ गोष्टी, सोपा आहार - पाहा बदल

पचायला सोपे

पोहे पचायला खूप हलके, व चवीला उत्कृष्ट लागतात. पोहे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. याशिवाय, त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम आहार मानला जातो. पोह्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पोह्यांमध्ये कांदा, टोमॅटो इत्यादी भाज्यांचा समावेश होतो, जे जीवनसत्त्वे व इतर पौष्टीक घटकांचे उत्तम स्रोत आहे. 

Web Title: 3 reasons why you should eat Poha instead of White Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.