आपला लूक आणि इम्प्रेशन समोरच्या व्यक्तीवर चांगले पडावे, यासाठी आपली स्माईल (Yellow Teeth) खूप मदत करते. चमकत्या दातांमुळे आपले सौंदर्य आणखी खुलते. पण पिवळ्या दातांमुळे मनमोकळ्यापणाने हसताही येत नाही. बऱ्याचदा दात घासूनही दातांवरील पिवळा किळसवाणा थर लवकर निघत नाही. या पिवळ्या थराला प्लाक असे म्हणतात.
दातांवर बराच काळ प्लाक साचल्यामुळे ते टार्टरचे रूप घेते. टार्टरमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते. ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी, दात किडणे, दातांमधून रक्त येणे, दात कमकुवत होणे यासह इतर दातांच्या निगिडत समस्या निर्माण होतात(3 simple home remedies to whiten your teeth naturally).
जर घासूनही दातांवरील पिवळा थर निघत नसेल तर, आपण काही पदार्थ खाऊनही दातांचा पिवळा थर काढू शकता. यासंदर्भात, नोएडास्थित 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक' चे संचालक कपिल त्यागी सांगतात, 'जर आपल्याला डेण्टिस्टकडे न जाता दातांवरील पिवळा थर काढायचा असेल तर, काही घरगुती पदार्थ खाऊनही दात साफ करता येऊ शकते.'
च्युइंगम
आपण दात पांढरे करण्यासाठी च्युइंगम चघळू शकता. बहुतांश जण नियमित तंबाखू, चहा किंवा कॉफी पितात. ज्यामुळे दातांवर पिवळा थर जमा होऊ लागते. जर दातांवरील पिवळा थर काढायचा असेल तर, च्युइंगम चघळा. यामुळे दात नक्कीच स्वच्छ होतील.
तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ
दुग्धजन्य पदार्थ खा
दूध, दही यासह दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट्स असतात. ज्यामुळे दातांचे सरंक्षण तर होतेच, शिवाय दातांना बळकट करण्यास मदत करते. यासह दातांचे, हिरड्यांचे आजार आणि पोकळीपासून संरक्षण करते.
फळे आणि भाज्या
सफरचंद, ब्रोकोली यासारख्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरयुक्त पदार्थ केवळ प्लाक काढून टाकण्यास मदत करत नाहीत, तर दातांच्या बळकटीसाठीही मदत करते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड नावाचे पदार्थ आढळते, ज्यामुळे दातांवरील पिवळसर डाग काढण्यास मदत मिळते.
गुडघ्यातून करकर आवाज, ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? कपभर दूधात ‘हा’ सुकामेवा घाला, हाडं होतील दणकट
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून, दात साफ करण्यासाठीही उपयुक्त ठरते. यासाठी टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करून दात घासा. यामुळे कॅव्हिटी आणि पिवळसर दातांपासून सुटका होते. आठवड्यातून साधारण १ वेळा आणि महिन्यातून २-३ वेळा केल्यास दात पांढरेशुभ्र होतील.
दात पांढरे करण्यासाठी लक्षात ठेवा काही टिप्स
दात पांढरे करण्यासाठी आणि तोंडाच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी ओरल हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी दिवसातून दोनदा फ्लोराईड टूथपेस्ट किंवा बेकिंग सोडा आणि टूथपेस्टने दात घासा.