Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री शांत झोप लागतच नाही- सारखी जाग येते? २ पदार्थ खा, छान झाेप होऊन सकाळी फ्रेश व्हाल

रात्री शांत झोप लागतच नाही- सारखी जाग येते? २ पदार्थ खा, छान झाेप होऊन सकाळी फ्रेश व्हाल

3 Simple Remedies For Sound Sleep At Night: रात्री बऱ्याच उशिरापर्यंत झोप लागत नसेल, झोप लागली तरी सारखी जाग येत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा...(3 foods that can help you get deep, quality sleep)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 12:47 PM2024-08-02T12:47:13+5:302024-08-02T12:47:49+5:30

3 Simple Remedies For Sound Sleep At Night: रात्री बऱ्याच उशिरापर्यंत झोप लागत नसेल, झोप लागली तरी सारखी जाग येत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा...(3 foods that can help you get deep, quality sleep)

3 simple remedies for sound sleep, 3 foods that can help you get deep, quality sleep | रात्री शांत झोप लागतच नाही- सारखी जाग येते? २ पदार्थ खा, छान झाेप होऊन सकाळी फ्रेश व्हाल

रात्री शांत झोप लागतच नाही- सारखी जाग येते? २ पदार्थ खा, छान झाेप होऊन सकाळी फ्रेश व्हाल

Highlightsखूप उशिरा म्हणजेच मध्यरात्री कधीतरी डोळा लागतो. त्यानंतरही अधूनमधून सारखी जाग येते. त्यामुळे अंगातला थकवा, आळस जातच नाही.

रात्री शांत आणि पुरेशी झोप झाली तरच दुसऱ्यादिवशी सकाळी फ्रेश जाग येते आणि तो दिवस चांगला जातो. नाहीतर मग रात्रीची झोप अपूरी झाली तर दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवस खूप आळसात जातो. दिवसभर थकल्यासारखे होते. कारण रात्रीची झोप म्हणजे आपलं शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. पण बऱ्याच जणांना रात्री शांत झोप येत नाही. एकतर खूप उशिरा म्हणजेच मध्यरात्री कधीतरी डोळा लागतो. त्यानंतरही अधूनमधून सारखी जाग येते (3 simple remedies for sound sleep). त्यामुळे अंगातला थकवा, आळस जातच नाही. तुम्हालाही असंच होत असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे काही उपाय करून पाहा..(3 foods that can help you get deep, quality sleep)

 

रात्री शांत झोप लागत नसेल तर उपाय

रात्री  शांत झोप लागत नसेल तर काय उपाय करावे, याची माहिती आहारतज्ज्ञांनी dt.lavleen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले उपाय पुढीलप्रमाणे

मेदूवड्यात मधोमध परफेक्ट छिद्र पाडताच येत नाही? १ सोपी ट्रिक-करा गोल गरगरीत मेदूवडे

१. व्हिटॅमिन बी१ आणि बी९ असणारे पदार्थ

व्हिटॅमिन बी१ आणि बी९ असणारे पदार्थ तुमचे शरीर आपोआप रिलॅक्स करण्यास मदत करतात. शरीर रिलॅक्स झालं तर रात्री लवकर आणि शांत झोप येण्यास मदत होते. हे पदार्थ मिळविण्यासाठी गव्हाच्या कोवळ्या पातीचा ज्यूस, बार्ली आणि शेवग्याची पाने हे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे घेत चला.

 

२. मेलॅटोनिन देणारे पदार्थ

ट्रिप्टोफॅन, मेलॅटोनिन हे अमिनो ॲसिड देणारे पदार्थ आपल्या आहारात असावेत. यासाठी बदाम, भोपळ्याच्या बिया, काजू, पिस्ता हे पदार्थ रोज खा. यामुळेही लवकर आणि शांत झोप येण्यास मदत होते.

केस अजिबातच वाढत नाही? लसूण तेल लावा! एवढे भराभर वाढतील की वारंवार कापावे लागतील 

३. मानसिक समाधान

मानसिक समाधान असेल तर लवकर झोप लागते. शांत झोप येते. यासाठी दररोज रात्री झोपण्यापुर्वी वही पेन घेऊन बसा. संपूर्ण दिवसभरात तुमच्याबाबतीत घडलेल्या ३ चांगल्या गोष्टी त्या वहीमध्ये रोजच्या रोज लिहा. यातून आपलं आपल्यालाच समाधान मिळतं आणि वाईट, निगेटिव्ह गोष्टी थोड्या विसरल्या जातात. याचाही परिणाम शांत झोप येण्यावर होतो.  


 

 

Web Title: 3 simple remedies for sound sleep, 3 foods that can help you get deep, quality sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.