Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जंक फूड-स्ट्रेस-हेअर कलर; केस गळण्याची ३ मुख्य कारणं- टक्कलही पडू शकतं कारण...

जंक फूड-स्ट्रेस-हेअर कलर; केस गळण्याची ३ मुख्य कारणं- टक्कलही पडू शकतं कारण...

3 unhealthy habits that lead to unnecessary hair loss : जंक फूड खाणे, केसांना कलरिंग करणे आणि स्ट्रेस यामुळे टक्कल पडते असे तज्ज्ञांचे मत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 07:10 PM2024-08-24T19:10:53+5:302024-08-24T19:32:02+5:30

3 unhealthy habits that lead to unnecessary hair loss : जंक फूड खाणे, केसांना कलरिंग करणे आणि स्ट्रेस यामुळे टक्कल पडते असे तज्ज्ञांचे मत आहे.

3 unhealthy habits that lead to unnecessary hair loss Unnecessary hair loss Skip these 3 unhealthy habits | जंक फूड-स्ट्रेस-हेअर कलर; केस गळण्याची ३ मुख्य कारणं- टक्कलही पडू शकतं कारण...

जंक फूड-स्ट्रेस-हेअर कलर; केस गळण्याची ३ मुख्य कारणं- टक्कलही पडू शकतं कारण...

अचानक नको त्या वयात टक्कल पडणे ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी गोष्ट असते. यासोबतच आजकाल प्रत्येकजण केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करतच असतो. केस गळून टक्कल पडण्याची अनेक कारणे आहेत. स्ट्रेस, संतुलित आहाराचा अभाव, हार्मोनल बदल, अनुवंशिक समस्या, प्रदूषण यांसारख्या गोष्टींमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. यासोबतच वारंवार बाहेरचे जंक फूड खाणे, केसांच्या स्टायलिंगसाठी केसांवर वारंवार वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंट्स करणे आणि स्ट्रेस घेणे ही टक्कल पडण्याची मुख्य कारण आहेत. तज्ज्ञांच्या मते साधारणपणे, वयाच्या ४० वर्षानंतर टक्कल पडण्याची समस्या आनुवंशिक प्रकरणांमध्ये निर्माण होते, परंतु आता हीच समस्या ऐन तारुण्यात असणाऱ्यांना देखील फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ३० ते ४० वयोगटांतील तरुणींना देखील या समस्येचा सामना करावा लागत आहे(3 unhealthy habits that lead to unnecessary hair loss).

 टक्कल पडण्याची समस्या आता पुरुषांबरोबरच महिलांमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्त्रीयांमध्ये सततचा घेतला जाणारा स्ट्रेस, बिझी रुटीन, केसांना वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन हेअर स्टायलिंग करणे तसेच हेअर प्रॉडक्ट्स मधील केमिकल्स आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतल्याने होणारे हार्मोनल बदल ही महिलांना टक्कल पडण्याची मुख्य कारणे आहेत(Unnecessary hair loss? Skip these 3 unhealthy habits).

जंक फूड खाणे, केसांना कलरिंग करणे आणि स्ट्रेस यामुळे टक्कल पडते असे तज्ज्ञांचे मत आहे. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सृष्टी त्रिपाठी यांच्या मते, "तरुणांमध्ये रंग देणे, स्ट्रेटनिंग मधील केमिकल्समुळे होणारे नुकसान, फंगल इन्फेक्शन, अधिक तणाव, हार्मोनचे असंतुलन, ऑटो इम्यून डिसऑर्डर अशा कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या वाढत आहे. पुरुषांबरोबरच महिलांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण वाढत आहे". 

प्रियांका चोप्रा सांगते तिच्या गुलाबी ओठांचं सिक्रेट- होममेड लिप स्क्रबचा अनोखा उपाय, खुलते सौंदर्य...

केसांच्या समस्यांवर शेवग्याच्या पानांचा आयुर्वेदिक पारंपरिक उपाय, केसांच्या सौंदर्यात पडेल भर... 

यासुद्धा कारणांमुळे आपले केस गळतात... 

१. जंक फूड अतिप्रमाणात खाणे. 
२. प्रदूषित वातावरणाचा अतिरेक. 
३. जास्त मानसिक किंवा शारीरिक ताण. 
४. संतुलित पोषण आहाराचा अभाव.  
५. जीवनशैलीतील बदलामुळे हार्मोनल संतुलन बिघडणे. 
६. थायरॉईड, पीसीओडी सारखे आजार.  
७. कौटुंबिक इतिहास. 
८. दारु सारखी उत्तेजक पेय पिणे. 

अचानक आपले केस कमी होऊन टक्कल पडू लागले तर त्याची वेळीच तपासणी करुन आणि त्यामागचे ठोस कारण शोधून योग्य ते उपचार घेतल्यास टक्कल पडण्याची ही समस्या सोडवली जाऊ शकते.

Web Title: 3 unhealthy habits that lead to unnecessary hair loss Unnecessary hair loss Skip these 3 unhealthy habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.