हिवाळ्यात वातावरणातील गारठा सतत वाढतो. जसजशी थंडी वाढते तसे या वाढत्या थंडीला सहन करणे फारच अवघड जाते. आपल्या सारख्या मोठ्या माणसांनाच ही थंडी झेलणे कठीण जाते तर घरातील लहान मुलांना याचा फारच त्रास होतो. घरातील लहान मुलांसाठी काहीवेळा हिवाळ्याचे दिवस म्हणजे नकोसेच वाटतात. हिवाळ्यात आपल्या सोबतच लहान मुलांची देखील तितकीच विशेष काळजी घ्यावी लागते(How to boost child's immunity naturally in the winter).
लहान मुलं वातावरणातील गारठा फारसा सहन करु शकत नाहीत. यामुळेच हिवाळ्यात मुलांची इम्युनिटी बिघडून वरचेवर त्यांना ताप, खोकला, सर्दी, कफ असे असे लहान - मोठे आजार होतात. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांची प्रतिकारक शक्ती तितकी स्ट्रॉंग नसते, यामुळे हिवाळ्यात लहान मुलांच्या तब्येतीची खूप काळजी घेतली पाहिजे. यासाठीच, मुलांचे आजारपण टाळून हिवाळ्यातही त्यांना ठणठणीत ठेवायचं असेल तर ऋतुमानानुसार काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अतिशय महत्वाचे आहे. थंडीचा पारा वाढू लागला की, मुलांची इम्युनिटी बिघडू नये म्हणून पालकांनी लक्षात ठेवाव्यात अशा तीन खास गोष्टी कोणत्या ते पाहूयात(3 Ways To Boost Your Child's Immune System In Winters).
हिवाळ्यात मुलांची इम्युनिटी खराब होऊ नये म्हणून...
१. मुलांना हायड्रेट ठेवा :- हिवाळ्यात वातावरणातील गारठ्याने आपल्याला शक्यतो फारशी तहान लागत नाही. तहान न लागल्यामुळे आपण या दिवसांत शरीराला आवश्यक तितके पाणी पीत नाही. यामुळे आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. वातावरणातील बदलांमुळे घराबाहेर पडल्याने शरीरातील हायड्रेशनची पातळी घसरते आणि थकवा जाणवू लागतो. घरातून बाहेर पडताना कायम मुलांसोबत पाण्याची बाटली नक्की द्यावी. जितकी तहान लागेल तितके पाणी सतत पीत राहावे, असे मुलांना सांगावे. पाण्यामध्ये आवळा आणि लिंबू असे अँटीऑक्सिडंट्स देखील मिसळता येतील, ज्यामुळे मुलांच्या शरीरातील हायड्रेशनची पातळी वाढेल. मुलांचे शरीर डिहायड्रेट झाले आहे अथवा नाही हे समजून घेण्याचा अजून एक सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या लघवीचा रंग. अतिशय हलक्या, फिकट रंगाची लघवी होणे याचा अर्थ शरीराला आवश्यक तितके पुरेसे पाणी मिळत आहे. याउलट, गडद पिवळा रंग असेल तर पाण्याची कमतरता आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे.
२. व्हिटॅमिन 'डी' :- जर आपले मूळ वारंवार आजारी पडत असेल तर त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता नाही ना हे पालकांनी एकदा तपासून घेणे आवश्यक आहे. शरीरातील इम्युनिटी वाढण्यासाठी व्हिटॅमिन 'डी' ची योग्य मात्रा आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन 'डी' चा उत्तम स्रोत मानला जातो. सध्या बदलत्या लाईफस्टाइलमुळे सूर्यप्रकाशाशी मुलांचा थेट संबंध येत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता भासू शकते. दही, पालक, पनीर, गाजर, संत्री अशा व्हिटॅमिन 'डी' युक्त पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करावा.
खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
३. डाएट :- हिवाळ्यात मुलांच्या डाएटकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांना बाहेरचे अन्नपदार्थ खायला न देता घरचे ताजे, सकस जेवण खायला द्यावे. प्रोसेस्ड फूड, साखर, मैदा, फास्ट फूड, जंक फूड यांसारखे पदार्थ मुलांना खायला देऊ नये. याउलट, पालेभाज्या, सिझनल फळ खाण्यावर अधिक भर द्यावा.
नेहा भसीनला जगणं मुश्किल करणारा PMDD आजार नेमका आहे काय? मासिक पाळीचं भयंकर दुखणं...