Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अशा पद्धतीने मोबाईल पकडाल तर हमखास पाठदुखी- खांदेदुखी छळणार.. बघा मोबाईल पकडण्याच्या ३ चुकीच्या पद्धती

अशा पद्धतीने मोबाईल पकडाल तर हमखास पाठदुखी- खांदेदुखी छळणार.. बघा मोबाईल पकडण्याच्या ३ चुकीच्या पद्धती

Wrong Ways of Holding or Watching Mobile: अशा पद्धतीने मोबाईल पकडण्याची सवय तुम्हालाही आहे का एकदा तपासून बघा आणि अशी सवय असेल तर लगेच सोडून द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 08:17 AM2022-12-17T08:17:54+5:302022-12-17T08:20:02+5:30

Wrong Ways of Holding or Watching Mobile: अशा पद्धतीने मोबाईल पकडण्याची सवय तुम्हालाही आहे का एकदा तपासून बघा आणि अशी सवय असेल तर लगेच सोडून द्या..

3 Wrong ways of holding or watching mobile, Using mobile in following 3 ways may create serious back pain | अशा पद्धतीने मोबाईल पकडाल तर हमखास पाठदुखी- खांदेदुखी छळणार.. बघा मोबाईल पकडण्याच्या ३ चुकीच्या पद्धती

अशा पद्धतीने मोबाईल पकडाल तर हमखास पाठदुखी- खांदेदुखी छळणार.. बघा मोबाईल पकडण्याच्या ३ चुकीच्या पद्धती

Highlights मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे.

मोबाईल आज प्रत्येकासाठीच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट झाला आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोप न लागणे असे त्रास तर अनेकांना होतच आहेत. पण मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे. त्यामुळे तुम्हालाही मोबाईल खाली दिलेल्या चुकीच्या पद्धतीने पकडण्याची सवय असेल, तर ती त्वरीत सोडा. अशा पद्धतीने मोबाईल पाहिल्यास कोणकोणते त्रास उद्भवू शकतात, याविषयीची माहिती sukoon.physical.therapy या इन्स्टाग्राम पेजवर डॉ. वरूण यांनी शेअर केली आहे. 

मोबाईल पकडण्याच्या ३ चुकीच्या पद्धती
पहिली पद्धत

बेडवर पाठीवर झोपायचे आणि दोन्ही हात वर करून हातात मोबाईल पकडायचा, अशी सवय अनेकांना असते.

केसांसाठी ५ प्रकारचे होममेड हेअर स्प्रे! केसांची नेमकी समस्या ओळखा आणि त्यानुसार हेअर स्प्रे वापरा

ही सवय अतिशय चुकीची आहे. कारण यामुळे खांद्यावर आणि मानेच्या स्नायूंवर खूप ताण येतो. वारंवार अशा पद्धतीने मोबाईल पकडून बघाल तर मानदुखी आणि खांदेदुखी मागे लागेल.

 

दुसरी पद्धत
या पद्धतीमध्ये अनेक जण एका अंगावर झोपतात. एक हात कोपऱ्यात वाकवून तळहात डोक्याखाली ठेवतात आणि मग दुसऱ्या हाताने मोबाईल बघतात.

डाळिंब खाऊन सालं फेकून देऊ नका; डाळिंबाच्या सालींचे ८ जबरदस्त फायदे, अत्यंत आरोग्यदायी उपयोग

ही सवयही खांदेदुखी आणि मानदुखी मागे लावणारी आहे. कारण अशा पद्धतीने मोबाईल बघताना जो हात डोक्याखाली ठेवला जातो तो आपण विरुद्ध दिशेने वळवलेला असतो. त्यामुळे खांद्याच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो, मानेचे स्नायूही ताणले जातात. 

 

तिसरी पद्धत
अशा पद्धतीने मोबाईल बघण्याची किंवा पकडण्याची सवय बहुतांश तरुण मुला- मुलींमध्ये बघायला मिळते.

अमेरिकन तरुणाने केला झणझणीत राजस्थानी मिरची वडा! पाहून तोंडाला पाणी सुटेल, बघा रेसिपी, व्हिडिओ व्हायरल

यामध्ये पोटावर झोपतात. छातखाली उशी ठेवलेली असते. दोन्ही हात कोपऱ्यात वाकवले जातात आणि मोबाईल पकडला जातो. यामुळे खांदे, हाताचे काेपरे यावर तर ताण येतोच. पण पाठीचा कणा आणि कंबर इथले स्नायूही ताणले जातात. अशा पद्धतीने मोबाईल पाहिल्यास मणक्यात किंवा कंबरेत गॅपही येऊ शकतो. 

 

Web Title: 3 Wrong ways of holding or watching mobile, Using mobile in following 3 ways may create serious back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.