Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्लडप्रेशर कायम कंट्रोलमध्ये ठेवायचं तर करा ३ सोपे उपाय, शरीराला फार कष्ट नाही - बीपी राहील नियंत्रणात...

ब्लडप्रेशर कायम कंट्रोलमध्ये ठेवायचं तर करा ३ सोपे उपाय, शरीराला फार कष्ट नाही - बीपी राहील नियंत्रणात...

3 Yoga Poses for High Blood Pressure : ब्लडप्रेशर कायम कंट्रोलमध्ये ठेवणे आपल्या लाइफस्टाइलवरही अवलंबून असतं, त्यामुळे ३ गोष्टी नियमित करा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 05:48 PM2023-11-10T17:48:21+5:302023-11-10T18:00:33+5:30

3 Yoga Poses for High Blood Pressure : ब्लडप्रेशर कायम कंट्रोलमध्ये ठेवणे आपल्या लाइफस्टाइलवरही अवलंबून असतं, त्यामुळे ३ गोष्टी नियमित करा....

3 yoga poses that can reduce high blood pressure, Yoga Poses for High Blood Pressure | ब्लडप्रेशर कायम कंट्रोलमध्ये ठेवायचं तर करा ३ सोपे उपाय, शरीराला फार कष्ट नाही - बीपी राहील नियंत्रणात...

ब्लडप्रेशर कायम कंट्रोलमध्ये ठेवायचं तर करा ३ सोपे उपाय, शरीराला फार कष्ट नाही - बीपी राहील नियंत्रणात...

बदलती लाईफस्टाईल व आहाराच्या बदलत्या सवयी यामुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आजकाल तरुणांमध्ये देखील हाय ब्लड प्रेशर असण्याचे प्रमाण हे वाढताना दिसत आहे. ब्लड प्रेशर हा आजार तसा सामान्य वाटतो, परंतु या आजाराला जर आपण वेळीच कंट्रोल केले तर यामुळे हार्टअटॅक, स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो(Yoga for High Blood Pressure).

उत्तम आरोग्यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. अनेकदा ब्लड प्रेशर (3 yoga poses that can reduce high blood pressure) वाढते किंवा कमी होते. ही बाब शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. वाढते ताणतणाव, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि वाढती स्पर्धा यांमुळे रक्तदाबाची समस्या उद्भवत असल्याचे दिसते. कधी कमी रक्तदाबामुळे तर कधी जास्त रक्तदाबामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत असल्याचे दिसते. एकदा रक्तदाबाची समस्या मागे लागली की शरीराच्या विविध अवयवांवर परीणाम होत राहतो. हृदय, मेंदू, किडनी हे रक्तदाबाचा परिणाम होणारे काही प्रमुख अवयव आहेत. म्हणूनच रक्तदाब नियंत्रणात (yoga to reduce blood pressure immediately) ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करणे आवश्यक असते. लखनऊ मधील रवींद्र योग क्लिनिकचे योग तज्ज्ञ रवींद्र कुमार श्रीवास्तव यांनी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी ३ सोपी योगासन करण्याचा सल्ला दिला आहे(Yoga Poses for High Blood Pressure).

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ३ सोपी योगासन... 

१. सुखासन :- सुखासन केल्याने तणाव दूर होण्यास आणि बीपी नियंत्रित होण्यास मदत होते. सुखासन हे श्वासोच्छवासाचे नियमन करण्यासाठी उत्तम आसन आहे. याने मन आणि शरीर शांत ठेवता येते. सुख आणि आसन या दोन शब्दांनी मिळून तयार झालेला. या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, शरीराची रोगांपासून बचाव करण्याची ताकद वाढते. शरीर आणि मनाला स्वास्थ्य, शांति आणि सुख मिळवून देण्यासाठीचं हे सोपं आसन आहे.

ब्रा बल्ज दिसल्याने सगळा लूक खराब होतो? करा ३ सोपे उपाय, पाठीवरची लोंबती चरबी होईल कमी...

सुखासन करताना सर्वात आधी जमिनीवर सतरंजी घालून मांडी घालून बसावं. सुखासन करताना मांडी घालून बसणं, अर्ध पद्मासन किंवा पूर्ण पदमासनात बसलं तरी चालतं. दोन्ही हात ओमच्या स्थितीत गुडघ्यावर टेकवावेत. सुखासन करताना पाठीचा कणा अगदी ताठ हवा. डोळे बंद करुन शरीरावरचा सर्व ताण पूर्णपणे काढून टाकावा.या आसनात दीर्घ श्वसन करत राहावं. या आसनात किमान दहा मिनिटं तरी बसावं.

२. शवासन :- आपण दिवसभर नुसते धावत असतो. त्या नादात आपण शरीर आणि मन शांत करण्याकडे लक्ष देत नाही. पण शवासनामध्ये शरीर आणि मन एकाग्र करायचे असल्याने मन शांत होण्यास मदत होते. मानसिक ताण असणाऱ्यांसाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला फायदा होतो. 

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

झोप येण्यासाठी तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी शवासन हे योगासनातील उत्तम आसन आहे. शवासन करणं सोपं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे आसन सहज करु शकते. शवासन करण्यासाठी जमिनीवर सतरंजी अंथरावी. सतरंजीवर सरळ झोपावं. सर्व अवयवावरील ताण काढून टाकावा. दोन्ही हात छताच्या दिशेने जमिनीला टेकलेले आणि पाय दोन्ही बाजूंनी कललेले असावेत. मान एका बाजूला कललेली असावी. डोळे मिटलेले असावे. एक दीर्घ श्वास घेऊन नंतर अगदी मंद श्वसन सुरु ठेवावं. ५ ते १० मिनिटं याच अवस्थेत पडून राहावं. शवासन केल्यानं शरीराप्रमाणे मनावरचा ताणही निघून जातो. मन शांत होतं. त्याचा फायदा झोप लवकर येते, शांत झोप लागते तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 

३. भुजंगासन :- भुजंगासन केल्याने शरीरातील ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह सुधारतो. यामुळे शरीर आणि मनावरील तणावही कमी होतो आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

भुजंगासन करताना पोटावर झोपावं. दोन्ही पाय जवळ जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या बाजूने जमिनीवर टेकवून ठेवावेत.  हनुवटी जमिनीला टेकलेली असावी.  लांब श्वास घेत दोन्ही हातांवर भार देत वर उठावं. नजर वर छताकडे ठेवावी.  आसन सोडताना श्वास सोडत हळूहळू पोटाचा, छातीचा भाग जमिनीला टेकवावा आणि सगळ्यात शेवटी कपाळ जमिनीला टेकवावे. असे हे भुजंगासन करायला अतिशय सोपे असून त्यासाठी फारसा वेळही लागत नाही.

Web Title: 3 yoga poses that can reduce high blood pressure, Yoga Poses for High Blood Pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.