Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वतःच्या आरोग्यासाठी महिनाभर साखर सोडून तर पाहा; दिसतील आश्चर्यकारक बदल - वजन घटेल आणि..

स्वतःच्या आरोग्यासाठी महिनाभर साखर सोडून तर पाहा; दिसतील आश्चर्यकारक बदल - वजन घटेल आणि..

30-Day No Sugar Challenge: Benefits, What to Expect, and More : महिनाभर स्वतःला करा चॅलेंच; साखर सोडून मिळवा भन्नाट आरोग्यदायी फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 05:30 PM2024-08-07T17:30:09+5:302024-08-07T17:31:16+5:30

30-Day No Sugar Challenge: Benefits, What to Expect, and More : महिनाभर स्वतःला करा चॅलेंच; साखर सोडून मिळवा भन्नाट आरोग्यदायी फायदे

30-Day No Sugar Challenge: Benefits, What to Expect, and More | स्वतःच्या आरोग्यासाठी महिनाभर साखर सोडून तर पाहा; दिसतील आश्चर्यकारक बदल - वजन घटेल आणि..

स्वतःच्या आरोग्यासाठी महिनाभर साखर सोडून तर पाहा; दिसतील आश्चर्यकारक बदल - वजन घटेल आणि..

काहींना गोड खाल्ल्याशिवाय जमतचं नाही (No Sugar). जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा प्रत्येकाला होतेच. पण गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं आणि इतरही गंभीर आजार छळतात (Health Tips). पण हीच साखर आपण ३० दिवसांसाठी सोडून पाहिली तर? ३० दिवस साखर सोडल्याने शरीरात कोणते बदल घडू शकतात? साखर आपण सोडू शकतो, पण काही पदार्थातून आपण नकळत साखर खातोच. जे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.

२०१९ साली अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, दरवर्षी सरासरी एक व्यक्ती २८ किलो साखर खाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, एका व्यक्तीने दिवसात ६ - ७ चमचे साखर खायला हवे. याचा अर्थ २५ - ३० ग्रॅम साखर दिवसभरात खावी. यापेक्षा जास्त साखर खाल्ल्यास गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो(30-Day No Sugar Challenge: Benefits, What to Expect, and More).

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

शिवाय महिलांनी पुरुषांपेक्षा कमी साखर खावी. पुरुषांनी एका दिवसात १५० कॅलरी साखर खावी तर, महिलांनी १०० कॅलरी साखर खावी.'

३० दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात कोणते बदल घडतात?

- साखर आपण अनेक पदार्थांतून खातो. पण साखर किंवा साखरयुक्त पदार्थ खाणं टाळल्याने आपल्याला पूर्वीपेक्षा उत्साही वाटू शकते. कारण आपण कमी कॅलरी खातो. ज्यामुळे वजन कमी होते. आणि आपल्याला उत्साही आणि फ्रेश वाटते.

- शरीरातील साखरेची पातळी वाढणे व इन्शुलिनचे जास्त उत्पादनामुळे मधुमेहाचा आजार होतो. यासह जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो, ज्यामुळे मधुमेह होऊ शकते. मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर, साखर अतिप्रमाणात खाणं शक्यतो टाळावे.

- साखर सोडल्याने त्वचेवरही सकरात्मक परिणाम दिसून येतो. यामुळे चेहऱ्याची सूजही कमी होते. साखर कमी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.  यामुळे ब्लोटिंगच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

- साखर कमी खाल्ल्याने आपण दिवसभर एनर्जेटिक राहतो. शरीरातील रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते. यामुळे रोगांचा धोकाही कमी होतो.

- साखर सोडल्याने थकवाही दूर होतो. जर आपल्याला वारंवार थकवा जाणवत असेल तर, साखर सोडणं उत्तम ठरू शकतं. 

Web Title: 30-Day No Sugar Challenge: Benefits, What to Expect, and More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.