घराची साफसफाई (Home Cleaning Tips) करण्याचं काम तुम्ही कमीत कमी वेळात करू शकता. घर कितीही स्वच्छ केलं आवरलं की अस्वच्छता दिसते अशी अनेकांची तक्रार असते. महिन्यातून २ वेळा तुम्ही घराची व्यवस्थित साफ-सफआई करून तुम्ही घराला मेंटेन ठेवू शकता. घर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त ३० मिनिटांचा वेळ लागेल. ज्यामुळे घर चमकदार, स्वच्छ दिसेल. (30 Minutes House Cleaning Tips And Tricks)
होमकिपिंगच्या रिपोर्टनुसार पिलो कव्हरनं फॅन स्वच्छ करा किंवा सॉक्सच्या मदतीनं फॅनचे ब्लेड्स स्वच्छ करणं सहज स्वच्छ होईल. अंथरूण नेहमीच स्वच्छ ठेवा, लेमन ऑईल आणि व्हिनेगरच्या मदतीने फर्नीचर साफ करणं सोपं होईल. कारपेटस् धुवून त्यावरचे डाग काढून घ्या. मायक्रो फायबर कापडानं हे डाग काढून टाका.
1) पसरलेले कपडे कसे व्यवस्थित ठेवावेत?
घराची साफ-सफाई कमीत कमी वेळेत करायची असेल तर सामान एका ठिकाणी बांधायला सुरूवात करायला हवी. सर्व जुने, वापरात नसलेले कपडे एका लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवा त्यानंतर सर्व चांगले कपडे एका कपाटात ठेवा. याव्यतिरिक्त सर्व वस्तू ज्या त्या जागेवर पटापट परत ठेवून द्या. कारण हे करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.
2) वॅक्यूम क्लिनरनं धूळ काढून टाका
वॅक्यूमनं तुम्ही एकत्र अनेक वस्तूंवरची धूळ काढून टाकू शकता. अशा स्थितीत वॅक्यूमनं सगळ्यात आधी पडदे, चटई आणि सोफा साफ करून घ्या. याची साफसफाई सिस्टमेटिक आणि व्यवस्थित करायला हवी. यात वेळही कमी लागतो.
3) फरशी व्हिनेगर आणि डिटर्जेंटने स्वच्छ करा
रोजच्या कामाच्या गडबडीत फरशी साफ करताना फरशीवर वेगवेगळे डाग लागतात. अशा स्थितीत डागांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तासनतास घासत असाल तर त्याला खूप वेळ लागू शकतो. लादी पुसण्यासाठी पाण्यात व्हिनेगर आणि डिटर्जेंटची पावडर घालून फरशी पुसा. या उपायानं डाग सहज निघून जातील. डाग निघून देल्यानंतर फरशी नव्यासारखी दिसेल.
4) भांडी कशी स्वच्छ करायची?
भांडी एक-एक करून धुवायला खूपच वेळ लागतो. सिंकमध्ये होणारं ड्रेन होल ब्लॉक करून यात गरम पाण्याबरोबर बेकिंग सोडा आणि हलका डिश लिक्विड घाला. ही सर्व भांडी ५ ते १० मिनिटांसाठी भिजवण्यासाठी ठेवा. त्यानंतर भांडी न घासता स्वच्छ होतील.
केस खूप तुटतात-पातळ झालेत? १ चमचा मेथी दाण्यांचा असा वापर करा, घनदाट-लांब केस मिळवा
5) किचन कसे स्वच्छ कराल?
किचन साफ करताना स्लॅब आणि सिंक यांमध्ये घाण जमा झाली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा किंवा व्हाईट व्हिनेगरचा वापर करू कता. यामुळे किचनमधील बॅक्टेरिया पूर्णपणे निघून जातील आणि किचन स्मेल फ्री होण्यासोबतच चमकदार दिसेल.
पोट सुटलंय-कंबर, मांड्या लठ्ठ दिसतात? १ चमचा हळदीचा खास उपाय, मेणासारखी वितळेल चरबी
बाथरूमधील टॉयलेट, आरसा आणि वॉश बेसिन चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. बाथरूमच्या आरश्यावर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर लावून नंतर पेपरनं रगडून स्वच्छ करा. याव्यतिरिक्त बाथरूमच्या टाईल्स चमकवण्यासाठीसुद्धा हा चांगला उपाय आहे.